जर तुम्ही ई श्रम कार्ड हे खूप महत्वपूर्ण असून देशातील जवळजवळ 28 कोटी पेक्षा जास्त लोकांनी या कार्डसाठी अर्ज केले आहेत. तसेच या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संबंधित श्रमिकाचा विमा सुद्धा केला जातो व कोणत्याही स्थितीत जर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचा विमा रक्कम देखील दिली जाते. परंतु यासाठी काही अटी असून त्यांचे पालन करणे गरजेचे आहे.
समजा जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल अशी व्यक्ती यासाठी अर्ज करू शकत नाही. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेचे खातेदारसुद्धा या कार्ड साठी पात्र नाहीत.
या कार्डमुळे दुर्घटना झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास संबंधित लाभार्थ्याला एक लाख रुपयांची मदत देखील केली जाते. जर तुम्हाला या कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही eshram.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहज सोप्या पद्धतीने नोंदणी करू शकतात.
नक्की वाचा:LIC च्या जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्ष गुंतवणूक करा आणि मिळवा 1 कोटी रुपयांचा लाभ
तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अशा पद्धतीने करा चेक
तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे आले किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ते घरी बसून तुमच्या खात्याची तपासणी करू शकतात. यासाठी तुम्ही ऑनलाईन बँकिंग वेबसाईटवर जाऊन त्याची स्टेटस तपासू शकता व सोबत पासबुकमध्ये एन्ट्री करून कन्फर्म करू शकतात.
बँकेत जाऊन पासबुकची एन्ट्री करता येते.जर तुम्हाला देखील श्रमिक कार्ड बनवायचे असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँकेचा अकाउंट नंबर असणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची चांदी, या दिवशी खात्यात 2000 रुपये येणार
Share your comments