केंद्र सरकार (central government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दिलासा मिळेल. यानुसार आता केंद्र सरकारकडून ई-पीक पाहणीसाठी नवीन मोबाईल अॅपची (Mobile app) सुधारित आवृत्ती - 2 विकसित करण्यात आली आहे.
माहितीनुसार ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या वर्षभराच्या अनुभवावरून हे अॅप आणले आहे. तसेच स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाइल अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी वापरण्यास सोपे आणि सुलभ मोबाइल अॅपची सुधारित आवृत्ती -२ विकसित (Version-2 developed) करण्यात आली आहे. हे सुधारित अॅप सोमवार म्हणजेच आजपासून (१ ऑगस्ट) शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
सुधारित मोबाइल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यिबदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून, शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यिबदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे.
शेतकरी पीक (crop) पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाइल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
हे ही वाचा
Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार
या नवीन अॅप मध्ये बदल काय?
1) शेतकरी मोबाइल अॅपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी ४८ तासांमध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करू शकणार आहेत.
2) पूर्वीच्या मोबाइल अॅपमध्ये असलेल्या मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
3) त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Horoscope: कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलेंडर आजपासून स्वस्त; जाणून घ्या किमती
Onion Rate: कांद्याचे दर वाढले! बाजारपेठेत मिळतोय 'इतका' दर, जाणून घ्या आजचा बाजारभाव
Share your comments