शेती क्षेत्रासाठी बऱ्याच प्रकारच्या योजना शासनाकडून आखण्यात आल्या असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील सुरू आहे. या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. आपल्याकडे बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. या पशुपालन व्यवसायाला आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्फत वेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेतआणि या योजनांचा फायदा देखील बरेच पशुपालक घेत आहेत. अशीच एक शासनाची योजना पशु पालकांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला माहित आहेच की, पशुपालना मध्ये जनावरांना लागणारा चारा ही सगळ्यात महत्त्वाची बाब असून बहुतांशी खर्च हा यावर जास्त होतो. याच पार्श्वभूमीवर शासनाने एक योजना चालवली आहे. या योजनेचे नाव आहे शेवगा लागवड अनुदान योजना ही होय.
नक्की वाचा:द्राक्ष उत्पादकांसाठी हेल्पलाइन; द्राक्ष उत्पादकांचे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एक पाऊल
काय आहे नेमकी ही योजना?
अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरांच्या वैरणी करिता शेवगा लागवड करणे सोपे व्हावे यासाठी शेवगा लागवड अनुदान या योजनेच्या माध्यमातून अनुदान देणार येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. ही योजना प्रामुख्याने राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेवगा ( पिकेएम 1) या बियाण्याचे प्रति हेक्टरी साडेसात किलो बियाणे याप्रमाणे या बियाण्याची किंमत सहा हजार 750 व उर्वरित अनुदान तेवीस हजार दोनशे पन्नास हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
हे बियाणे थेट पशुपालक शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार असून उर्वरित अनुदानाच्या माध्यमातून शेवगा लागवडीसाठी जमिनीची मशागत व लागवड, लागणाऱ्या खतांची खरेदी व इतर खर्च यामधून करायचा आहे.
नक्की वाचा:येणारा काळ आपलाच, फक्त करा या फुलांची शेती आणि मिळवा महिन्याला लाखो रुपये
शेवगा लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
पशुधन विकास योजनेमार्फत केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणी करता शेवगा लागवड अनुदान योजना दोन हजार बावीस साठी अर्ज सुरू झाले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
त्यासोबतच नंदुरबार व सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाकडून यासंबंधीची आवाहन करण्यात आले असून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकार्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून या अनुदानाचा लाभ घेणे शेतकऱ्यांना सोपे होईल.
Share your comments