1. सरकारी योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Government Scheme News

Government Scheme News

सुनील सोनटक्के

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

अनुदानाची माहिती

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे

  • नवीन विहीर: 2 लाख 50 हजार
  • जुनी विहीर दुरुस्ती: 50 हजार
  • इनवेल बोअरिंग: 20 हजार
  • पंप संच: 20 हजार (10 अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंप संचासाठी 100% अनुदान)
  • वीजजोडणी आकार: 10 हजार
  • शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण: 1 लाख
  • सूक्ष्म सिंचन संच:
  • ठिबक सिंचन संच: 50 हजार
  • तुषार सिंचन संच: 25 हजार

पॅकेजेस

योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत:

  1. नवीन विहीर पॅकेज

या पॅकेजमध्ये नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज

यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण

या पॅकेज अंतर्गत शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

पात्रतेच्या अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात:

  1. लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
  2. जात प्रमाणपत्र असावे.
  3. नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  4. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
  5. इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  6. कमाल शेतजमीन 6.00 हेक्टरआहे.
  7. 7/12 दाखला आणि 8 उतारा आवश्यक आहे.
  8. आधार कार्ड आवश्यक आहे.
  9. बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे.
  10. स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
  11. वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
  12. उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
  13. ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. अर्ज भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. वेबसाईटwww.mahadbt.maharashtra.gov.in http://www.mahadbt.maharashtra.gov.in
  2. ऑनलाईन अर्ज भरण्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते.
  3. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात:

  1. 7/12 दाखला आणि 8 उतारा
  2. 6 उतारा (फेरफार)
  3. जात प्रमाणपत्र
  4. तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला
  5. आधार कार्डाची छायांकित प्रत
  6. बँक पासबुकाची छायांकित प्रत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन-संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत. प्रशासनाच्या या योजनेतून आपल्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

सुनील सोनटक्केजिल्हा माहिती अधिकारीसोलापूर

English Summary: Dr Through Babasaheb Ambedkar Krishi Swalavamban Yojana farmers are moving towards financial empowerment Published on: 25 March 2025, 06:06 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters