Crop Insurance Scheme: देशात यंदा मुसळधार मान्सून (Heavy Monsoon) बरसत आहे. काही ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील (Kharip Season) हातातोंडाला आलेली पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे उध्वस्त झाली आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी (Farmers) उघड्यावर आला आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो दर मिळत नसल्यामुळे शेतीचा (Farming) खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून भरपाई मिळण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे.
ही योजना सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाची आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकार करते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये पिकांची नोंदणी करणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेतून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना या विमा योजनेतून देण्यात येते. तसेच या योजनेतून आजही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे.
सोन्याच्या दरात घसरण! सोने 6859 रुपयांपर्यंत स्वस्त; पहा नवीनतम दर...
शेतकऱ्यांनी या विमा योजनेत पिकांची नोंदणी केली असेल आणि नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाले तर या योजनेतून नुकसान भरपाई मिळू शकते. आतापर्यंत ३६ कोटी शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला आहे.
यंदाही शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या विमा योजनेत पिकांची नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना पिकांचा विमा मिळणे शक्य आहे. मात्र जर तुम्हालाही पिकांची नोंदणी करायची असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास त्यांना या योजनेचे संकेतस्थळ, https://pmfby.gov.in ला भेट द्यावी लागेल. याठिकाणी सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो.
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लंपी बाधित जनावरांसाठी मोठी घोषणा...
जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर जवळच्या बँक, सहकारी बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) या ठिकाणी करू शकता. मात्र पेरणीच्या १० दिवस अगोदर हा अर्ज करणे बंधनकारक आहे.
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कंपनीला याची माहिती द्यावी लागेल. त्यासाठी 72 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच काळात विमा कंपनीला कळवावे लागेल .
पंचनामा झाल्यानंतर अंदाजित नुकसानीचा आकडा नोंदवण्यात येतो. पिकांचे किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यात येतो. भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा करण्यात येते.
महत्वाच्या बातम्या:
उच्चशिक्षित तरुणाने नोकरीला ठोकला रामराम! देशी गायींचे गोमूत्र आणि दूध विकून करतोय करोडोंची कमाई
शेतकऱ्यांमागील साडेसाती हटेना! मुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागात पिके जमीनदोस्त
Share your comments