ढगाळ वातावरण आणि सततच्या रिमझिम पावसामुळे (rain) बऱ्याचे पिकांचे (crop) नुकसान होत आहे. अशा वातावरणात बऱ्याचदा उसावर पाकोळीवर रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मोठे नुकसान टळण्याआधी या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
किडीची ओळख
या किडीची मादी (A female insect) आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते, एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात. तर ते प्रौढ फिकट पिवळसर रंगाची आणि पाचरीच्या आकाराची असतात.
मोठी बातमी: 'या' योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 50 % अनुदान
प्रादुर्भावाची लक्षणे
या किडीची (insect) पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेतात त्यामुळे उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात. पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढतो. व पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते.
अलर्ट ! राज्यात उद्यापासून कोकण मुंबईसह 'या' ठिकाणी चार दिवस मुसळधार पाऊस
किडीचे करा असे व्यवस्थापन
1) रुंद सरी पद्धतीने कीडनाशकांची फवारणी करणे सोयीचे होईल.
2) नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नका.
3) जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी होईल.
4) पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करा.
5) निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवा.
6) वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करा.
7) व्हर्टिसिलियम लिकॅनी अथवा मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
8) रासायनिक व्यवस्थापनकरिता प्रति पान ३ ते ५ पिल्लं किंवा प्रौढ अथवा १ अंडीपुंज दिसून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के ६०० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के २०० मिली प्रति एकर फवारा.
महत्वाच्या बातम्या
पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता गाईच्या शेणानंतर सरकार खरेदी करणार गाईचे गोमूत्र
मोठी बातमी; अकाऊंटमध्ये झीरो रक्कम असली तरी काढता येणार, पहा प्रोसेस..
शेतकरी मित्रांनो: मटक्यात मशरूम वाढवून व्हा करोडपती; हा आहे सोप्पा उपाय
Share your comments