केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात मागील 8 दिवसापर्यंत सर्व बँकांनी मिळून एकूण ९७ हजार ९२५ शेतकऱ्यांना ७२८ कोटी २ लाख रुपये वाटत केले आहेत. यामध्ये १६ हजार २४७ शेतकऱ्यांना १५० कोटी ७९ लाख रुपयांचे नवीन पीककर्ज देण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे. महत्वाचे म्हणजे यावर्षीच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ हजार २०४ कोटी १५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत नवीन तीन नियम लागू; गुंतवणूक करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती..
यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंका ७६८ कोटी २४ लाख रुपये, खासगी बँका ९९ कोटी ६८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक १८४ कोटी ६४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १५१ कोटी ५९ लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. गुरुवार (ता. १५) पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी २९ हजार २९१ शेतकऱ्यांना २८९ कोटी ८९ लाख रुपये (३७.७३ टक्के).
मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार आनंदाचा काळ; वाचा आजचे राशीभविष्य
खासगी बँकांनी २ हजार ३६५ शेतकऱ्यांना २५ कोटी ५५ लाख रुपये (२५.६३ टक्के) पीककर्ज वितरित केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २८ हजार ७९८ शेतकऱ्यांना २५७ कोटी ५१ लाख रुपये १३९.४७ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३७ हजार ४७१ शेतकऱ्यांना १५५ कोटी ७ लाख (१०२.३० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
महत्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! 'या' दोन बँका FD वरील व्याजदर वाढवणार; गुंतवणूकदारांना मिळणार भरपूर लाभ
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
Tur Market Price: 'या' बाजार समितीत तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या दर
Share your comments