सरकारकडून अनेक योजना सुरू आहेत. असे असताना या योजनेचे अनेकजण पैसे घेतात, मात्र ती योजना कशासाठी आहे, ते काम करत नाहीत. यामुळे खऱ्या अर्थाने ती योजना पूर्ण होत नाही. घरकुल योजना यातीलच एक योजना आहे.
सरकारी नियमानुसार घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यापासून 90 ते 100 दिवसांत घराचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार 952 लाभार्थींनी पहिल्या हप्त्याचे पैसे घेऊनही घर बांधलेले नाही. यामुळे आता ते अडचणीत आले आहेत.
त्यांना आता लोकअदालतीसंदर्भात न्यायालयातून नोटीस बजावण्यात आली आहे. या लाभार्थींनी लोकअदालतीत पैसे न भरल्यास त्यांच्यावर शासकीय रकमेचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामुळे आता पैसे आले असतील तर घर बांधावे लागणार आहे.
ब्रेकिंग! मराठा समाजाला मोठा धक्का, आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा अवैध..
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली आहे. पहिला हप्ता घेऊनही वेळेत काम पूर्ण न केलेल्यांकर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवून लोकअदालतीतून त्यांच्याकडील रकमेची वसुली केली जात आहे. यामुळे आता राज्यात देखील कोणी पैसे घेऊन काम न करणे अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता तर काळजीच मिटली! भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार, उन्हापासून होणार चार्ज
इतिहासात पहिल्यांदाच कारखान्याचा काटा लॉक!! पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस
आता प्रत्येकाला मिळणार घर! पंतप्रधान आवास योजनेला वाढीव निधी
Share your comments