1. सरकारी योजना

PM Kisan Yojana: PM किसानचे पैसे जमा झाले नसतील तर करता येणार तक्रार

15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी 18,000 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसा जमा झाला नाही ते तक्रार दाखल करु शकता. त्याचबरोबर 15 व्या हप्ताचे पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करून बघू शकता.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
PM Kisan Yojana

पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे बघण्यासाठी -
सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
त्यानंतर ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यानंतर ‘गेट स्टेटस’वर क्लिक केल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

तक्रार दाखल करण्यासाठी -
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल.
आता "रजिस्टर कंप्लेंट" पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या कागदपत्रांच्या प्रती जोडा
तुमच्या तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटणावर क्लिक करावे.

English Summary: Complaint can be filed if PM Kisan's money is not collected Published on: 17 November 2023, 03:24 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters