शेतकरी वर्गाच्या हितासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार नेहमी शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी नवीन नवीन योजना आमलात आणत आहेत. गेल्या 4 ते 5 वर्षाच्या काळापासून शेतकरी वर्गाच्या हितासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. शेतकरी वर्गासाठी सदैव सरकार तत्पर आहे हे मात्र नक्कीच आहे.
राज्य सरकारची नवीन योजना:-
सध्या राज्यात राज्य सरकार ने राज्यातील शेतकरी वर्गाच्या हितासाठी नवीन योजना आणत आहेत. या योजनेचे नाव हे मुख्यमंत्री किसान योजना असे असेल असे सुद्धा सांगितले आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी वर्गाला वार्षिक 12 हजार रुपयांची मदत मिळू शकते. तसेच ही योजना लवकरात लवकर लागू करण्यात येईल असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले आहे शिवाय या योजनेची तरतूद लवकरच राज्याच्या वार्षिक आर्थिक बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.
हेही वाचा:-यामाहा कंपनीचे पेट्रोल इथेनॉल वर चालणारी दुचाकी ब्राझील मध्ये सज्ज, भारतात येतेय लवकरच...
मुख्यमंत्री शेतकरी योजना:-
या योजेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी गरजेचा जीआर अजून राज्य सरकार ने आम्लात आणला नाही शिवाय लवकरच या योजनेची सर्व माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोहचवली जाईल. तसेच लवकरात लवकर ही योजना आमलात आणली जाईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा:-ऑडी ने भारतामध्ये केली Q7 इडिशन लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कोणाला 12 हजार रुपयांचा लाभ मिळणार:-
कृषी विभागाची बैठक झाल्यानंतर ही माहिती समोर आली की आता काही शेतकरी बांधवांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतील या मध्ये पिएम किसान योजना आणि मुख्यमंत्री शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकरी बांधवांना 12 हजार रुपये मिळणार आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे.
Share your comments