Government Scheme Update :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याकडे जॉब कार्ड आहे असे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानासाठी पात्र असणार आहेत. राज्यामध्ये ८०% अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत पण त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याने ते शेतकरी बांधव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यासाठी अपात्र ठरत होते.
ही बाब लक्षात घेता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी माहाराष्ट्र सरकारने राज्यात माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली आहे. या योजनेत १५ विविध फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येत आहे.
कोणत्या कामांसाठी देण्यात येते अनुदान
१) खड्डे खोदणे
२)कलमांची लागवड करणे
३)पीक संरक्षण
४)नांग्या भरणे
५)ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे
६)सर्व प्रकारची खते
यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान सरकारकडून दिलं जाणार आहे. याबाबत शासान निर्णय देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३-२४ पासून करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे -
१) 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या ऐवजी रासायनिक व सेंद्रीय खते देण्याची मान्यता देण्यात येत आहे.
२) शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंड लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येणार आहे.
दरम्यान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आवश्यकते नुसार १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्यामुळे मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंडय मुंडे यांनी केलं आहे.
Share your comments