Central Government News : केंद्र सरकारच्या झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.४) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. आजपासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आले आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी कपात करण्यात आली.
पुढे ठाकूर म्हणाले की, सिलिंडरचे दर ११०० रुपयांवरून आता ९०० रुपयांवर आले आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलिंडर ७०० रुपयांना मिळत होता. आता ९०० रुपयांच्या सिलिंडरवर ३० रुपयांचं अनुदान मिळाल्यानंतर सिलिंदरचे दर ६०० रुपयांवर पोहोचले आहेत.
उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागतात. तर बाजारभाव ९०३ रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता त्यांना फक्त ६०३ रुपये मोजावे लागणार आहेत.
भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना अधिसूचित केली आहे. या मंडळामुळे हळदीबाबत जागरूकता आणि खप वाढण्यास आणि निर्यात वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाने तेलंगणामध्ये सम्माक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ मध्ये सुधारणा करण्यासही मान्यता दिली आहे.
Share your comments