MFOI 2024 Road Show
  1. सरकारी योजना

वैरण अनुदान! वैरणीसाठी शेवगा लागवड करणे या योजनेसाठी मिळणार प्रति हेक्टरी 30 हजार रुपये अनुदान

शेतकऱ्यांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध प्रकारच्यायोजना आखण्यात येतात.यायोजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
central goverment give subsidy to drustick cultivation for animal fodder

central goverment give subsidy to drustick cultivation for animal fodder

 शेतकऱ्यांसाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून विविध प्रकारच्यायोजना आखण्यात येतात.यायोजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

या योजनांच्या माध्यमातूनशेतीलाच नाही तर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनासाठी सुद्धाआर्थिक मदत केली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रासाठी तसेच पशुपालनात आर्थिक मदत व्हावी व त्यांना त्यांचा व्यवसाय करणे सोपे जावेहा त्यामागचा उद्देश असतो. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून वैरणीसाठी शेवगा लागवड करणे( अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेसाठी प्रति हेक्‍टर 30 हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून प्रतीजिल्हा पंधरा हेक्टर क्षेत्रासाठी  चार लाख 50 हजार रुपये याप्रमाणे चौथी जिल्ह्यांसाठी एक कोटी 53 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांचे संपर्क साधावा,  अशा आशयाचे अहवान पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केलेआहे.

नेमकी कशी आहे योजना?

 या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी/ पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. प्रति हेक्‍टर साडेसात किलो शेवगा  ( पी के एम1) बियाणे किंमत सहा हजार 750 रुपयेउर्वरित अनुदान 23 हजार 250 रुपये असे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. या माध्यमातून बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उरलेल्या अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खताची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च यामध्ये करायचा आहे. यामध्ये इच्छुक पशुपालक शेतकऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी  ( विस्तार ) पंचायत समिती ठाणे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा.

असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:आतापर्यंत फक्त रसायन मुक्त शेतीची घोषणाबाजी केली जात होती, मात्र आता जालना मधील कृषी विभागाने घोषणाच नाही तर अमलबजावणी केली आहे

नक्की वाचा:बहुगुणी काळी माती; आरोग्यासाठी आहे फायदेशीर

नक्की वाचा:काय आहे भारतीय आयुर्विमा कंपनीची कन्यादान पॉलिसी, जाणून घ्या

English Summary: central goverment give subsidy to drustick cultivation for animal fodder Published on: 04 May 2022, 01:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters