PM Kisan Samman Nidhi Scheme: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. आज 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी 18,000 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा करण्यात आला आहे.
आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीची भेट मिळाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा करते, यानूसार सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रूपये जमा करते. आत्तापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 14 हप्त्यांमध्ये 2.62 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील कार्यक्रमादरम्यान वितरण करण्यात आला होता.
बिरसा मुंडा यांच्या जयंती आणि आदिवासी गौरव दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या जन्मस्थळी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डीबीटीद्वारे देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने शेरकऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. यामुळे निश्चितच यंदा शेरकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
Share your comments