व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा म्हातारपण येईल तेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली हवी आणि वृद्धत्वात कुणावर अवलंबून राहू नये यासाठीबरेच जण नियोजन करीत असतात.म्हातारपणाच्या खर्चाने लोक चिंतेत असतात.
. बरेच जण पेन्शनचे नियोजन करतात.अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे योजना कमी गुंतवणुकीत पेन्शनची हमी देते. ही योजना म्हणजे केंद्र सरकारचे सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजना असून ही योजना अल्पावधीत खूप लोकप्रिय झाली आहे.
अटल पेन्शन योजनेमध्ये तुम्ही दर महिन्यालाकाही ठराविक रक्कम जमा केल्यास साठ वर्षानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन सुरू होते.याचाच अर्थ असा की तुमच्या वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हालाआर्थिक रित्या स्वावलंबी राहायचे असेल तरती सरकारी योजना तुमच्या साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
काय आहे अटल पेन्शन योजना?
अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची पेन्शन योजना असूनजी असंघटित क्षेत्रातील कामगारांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली होती.परंतु आता 18 ते 40 या वयोगटातील कुठलाही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेमध्ये एक हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत प्रति महिना मासिक पेन्शन मिळते.म्हणजेच वार्षिक साठ हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळते.
विशेष म्हणजे या योजनेत जर पती आणि पत्नी दोघेही पैसे जमा करत असतील तर दोघांनाही पेन्शन मिळू शकते.म्हणजे जर तुम्ही दहा हजार रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक एक लाख वीस हजार बचत खाते आणि मासिक दहा हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचे लाभधारक दिवसेंदिवस वाढत असून 2021-22या वर्षात त्यात 40 दशलक्ष पेक्षा अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत.
या योजनेसाठी खाते कसे उघडावे?
1-तुमचे बचत खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिस संपर्क साधावा.जर तुमचे बँक खाते नसेल तर नवीन खाते उघडावे.
2-पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अटल पेन्शन खाते उघडा.
3-यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर,ओळखपत्रआणि ऍड्रेस प्रूफ सादर करावा लागेल.
4- तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये मासिक, त्रैमासिक आणि सामान्य हप्त्यांमध्ये तुमचे योगदान देऊ शकतात.
5-अटल पेन्शन योजनेच्या खात्यात नॉमिनेशन डिटेल्स देणे आवश्यक आहे.जर ग्राहक विवाहित असेल तर जोडीदार डिफॉल्ट नॉमिनी असेल.अविवाहित लाभार्थी इतर कोणत्याही व्यक्तीला मदत करू शकतो.
खात्यात पुरेशी शिल्लक ठेवणे महत्त्वाचे
आपल्या बँक खात्यात अटल पेन्शन योजनेच्या प्रत्येक महिन्यासाठी किंवा ती माहिती किंवा अर्धवार्षिक हपत्यासाठी पुरेसे पैसे असावेत. ग्राहकांच्या बचत बँक खात्यात हप्त्याचे पैसे नसतील तर ते डिफॉल्ट मानले जाते किंवा विलंबित योगदान व्याजासह पुढील महिन्यात भरावे लागेल. उशिरा मासिक योगदान दर महिन्याला शंभर रुपये उशिरा दरमहा एक रुपया आकर्षित करेल.
वयाच्या साठ वर्षांपूर्वी पैसे काढणे
अटल पेन्शन योजना ही एक पेन्शन योजना आहे जी रिटायरमेंटनंतर दिली जाते.खातेदार वयाच्या साठ वर्षानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. खातेधारकाला वयाच्या साठव्या वर्षापर्यंत आपले योगदान द्यावे लागते.अटल पेन्शन योजनेचे खातेधारक साठ वर्षांपूर्वी बाहेर पडू शकत नाही.परंतु जर काही विशिष्ट परिस्थिती उद्भवली जसे की आजार किंवा मृत्यू या बाबतीततर व्यक्ती या योजनेतून बाहेर पडू शकते.
Share your comments