राज्यातील 82% शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये मोठे खंड या प्रमुख नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी शेतावर शेततळयासारखी पायाभूत सुविधा उभी करुन पाण्याची साठवणूक करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे त्याचप्रमाणे शेतीला पूरक मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारता यावे याकरिता शेतावर शेत तळयासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्याच्या अनुषंगाने मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात राबविण्यात येत असलेल्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतर्गत "नमो शेततळे अभियान" राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या नमो ११ सुत्री कार्यक्रमांतगर्त राज्यात "नमो शेततळे अभियान" राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यात ७३०० शेततळे उभारण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांचा समावेश सदर अभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळयांमध्ये करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधीतुन नमो शेततळे अभियान राबविण्यात यावे.
या अभियानाच्या अंमलबजावणी करिता छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेच्या अनुषंगाने परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील.
या योजनेचे फायदे -
शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होणार
वर्षभर सिंचन सुविधा मिळणार
अधिक उत्पन्न मिळेल
शेतकऱ्यांना वर्षभर विविध पीके घेता येतील
या योजनेबद्दल अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Share your comments