1. सरकारी योजना

Madh Kendra Yojana: रोजगाराची नवी संधी निर्माण करणारी मध केंद्र योजना असा करा अर्ज

महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत असते. अशीच एक महत्वाची योजना म्हणजे मध केंद्र योजना. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेची अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापन केली आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत आहे. तसेच शेतीला जोडधंधा म्हणून मध उत्पादन व्यवसायाकडे बघितले जाते, त्यामुळे मध केंद्र योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार ही निर्माण होईल.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Madh Kendra Yojana

योजनेचे लाभ काय असतील -
५० % साहित्य स्वरूपात अनुदान,
मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण

या योजनेतील वर्गवारी -
१. वैयक्तिक मधपाळ
२. केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ
३. केंद्र चालक संस्था
४. विशेष छंद प्रशिक्षण
५. आग्या मध संकलन प्रशिक्षण

वैयक्तिक मधपाळ -
१० पास असणे गरजेचे आहे
२४ हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक
२४ हजार रुपयांची साहित्य आणि साधने मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक

केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ -
२१ वर्ष पूर्ण
१० पास असणे गरजेचे आहे.
किमान १ एकर जमीन असणे आवश्यक आहे.
जमीन स्वतः ची नसल्यास भाडे तत्वावर घेणे.
मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे आवश्यक.

केंद्र चालक संस्था -
ही संस्था कायद्याने नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.
संस्थेकडे स्वतः ची किंवा भाड्याने घेतलेली १००० चौरस फूट इमारत आणि १ एकर जमीन पाहिजे.

विशेष छंद प्रशिक्षण -
२५ रुपये फी आकारण्यात येईल.
अर्ज करण्याकरिता सर्वजण पात्र आहेत.
५ दिवस शासकीय प्रशिक्षण देण्यात येईल.
आग्या मध संकलन प्रशिक्षण
१८ ते ५० वयोगटातील आणि साक्षर व्यक्ती यासाठी पात्र.
५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क –
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय.

English Summary: Apply for Madh Kendra Yojana which creates new employment opportunities Published on: 17 October 2023, 05:54 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters