नवी मुंबई : मित्रांनो भारतात नागरिकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना (Sarkari Yojana) राबविल्या आहेत. या योजनेत अनेक आरोग्यविषयक योजनेचा देखील समावेश आहे. आयुष्मान भारत ही देखील केंद्राची अशीच आरोग्य संदर्भात असलेली महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जातं आहे. या योजनेनुसार, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व्यक्तीला खर्च द्यावा लागणार नाही. या योजनेंतर्गत सरकारी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार पूर्णपणे मोफत दिला जातो.
मात्र, सरकारच्या या योजनेचा फायदा, तुम्ही तेव्हाच घेण्यास पात्र असाल जेव्हा तुम्ही आयुष्मान भारत योजनेत नाव नोंदणी करणार. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योजनेत नाव नोंदणी करावी लागेल आणि तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड बनवावे लागेल.
Royal Enfield: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट लाँच करणार; वाचा याविषयी
कसं बनवणार आयुष्मान भारत कार्ड
- सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या पब्लिक सर्विस केंद्राला भेट द्यावी लागेल. जिथे केंद्राचे अधिकारी यादीत तुमचे नाव तपासतील.
- आयुष्मान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव नोंदणीकृत असेल तरच तुम्हाला कार्ड दिले जाईल.
- तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड द्यावे लागेल.
- फोटो कॉपी, पास पोर्ट साइज फोटो इत्यादी सर्व केंद्राच्या अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतील.
- यानंतर नागरी सेवा केंद्र अधिकाऱ्याद्वारे तुमची नोंदणी केली जाईल.
- नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला अधिकृत नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल.
Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड नोंदणी केल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार, तुम्ही नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, तुम्ही तुमचे हेल्थ कार्ड बनवून देखील फायदा घेऊ शकता, यासाठी तुमच्याकडे आधी हॉस्पिटलमध्ये तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे असायला हवीत.
यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, रेशनकार्ड फोटो प्रत, पासपोर्ट साइज फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य यादीत तुमचे नाव तपासावे लागणार आहे. जर तुमचे नाव यादीत दिसले तर तुम्हाला आयुष्मान गोल्डन कार्ड देणे आवश्यक आहे.
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी
Share your comments