1. सरकारी योजना

PM Vishwakarma Scheme: पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रूपयांचे कर्ज मिळणार

केंद्र सरकार नेहमीच कल्याणकारी योजना राबवत असते. अशाच एका योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे, ती म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना पीएम विश्वकर्मा योजना ही मोठी भेट दिली. या योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि पारंपरिक व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
PM Vishwakarma Yojana update

PM Vishwakarma Yojana update

केंद्र सरकार नेहमीच कल्याणकारी योजना राबवत असते. अशाच एका योजनेअंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे, ती म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त देशवासीयांना पीएम विश्वकर्मा योजना ही मोठी भेट दिली. या योजनेअंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि पारंपरिक व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. या योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. 18 पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला असून योजनेचा लाभ घेण्यासाठी या 18 क्षेत्रांशी जोडलेलं असणं आवश्यक आहे.

किती कर्ज मिळणार -
या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम दोन टप्प्यात दिली जाते. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात व्यवसायाच्या विस्तारासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज अत्यंत सवलतीच्या 5 टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.

प्रशिक्षण -
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते. मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात असून प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल.

प्रशिक्षणातून मिळणारे फायदे -
लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड
15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन
डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन

या योजनेसाठी पात्रता -
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती खालीलपैकी 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे. सुतार, बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, मेस्त्री, मच्छिमार, टूल किट निर्माता, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली, चटई, झाडू बनवणारे, बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
आधार कार्ड
पॅन कार्ड
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
वैध मोबाईल नंबर
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
बँक पासबुक

या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठीची पात्रता -
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे.
मान्यताप्राप्त संस्थेचे ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.
या योजनेची अधिक माहिती pmvishwakarma.gov.in अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
तसेच अधिक विचारपूस करायची असेल तर संपर्क क्रमांक :मो. 9421859777, कार्यालय:02382-220144 या क्रमांकावर करता येईल.

English Summary: A loan of 3 lakh rupees will be available under PM Vishwakarma Yojana update Published on: 01 November 2023, 04:32 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters