1. सरकारी योजना

हे अभियान शेतकऱ्यांना बनवणार उद्योजक! 50 लाखांपर्यंत अनुदान मिळवून उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

भारतामध्ये कृषी व्यवसायासोबत कृषीपूरक अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात. शेती क्षेत्रासोबत या व्यवसायांचा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास हे एक महत्वाचे सूत्र आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अगदी त्याच पद्धतीने पशुपालन, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन आणि इतर शेतीपूरक व्यवसायाचा विकास व्हावा आणि अशा व्यवसायांना प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
subsidy for farmer

subsidy for farmer

भारतामध्ये कृषी व्यवसायासोबत कृषीपूरक अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात. शेती क्षेत्रासोबत या व्यवसायांचा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास हे एक महत्वाचे सूत्र आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेती क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अगदी त्याच पद्धतीने पशुपालन, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन आणि इतर  शेतीपूरक व्यवसायाचा विकास व्हावा आणि अशा व्यवसायांना प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानाचा विचार केला तर  या अभियानाच्या माध्यमातून जे काही शेतीपूरक व्यवसाय आहेत त्यांना कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

 सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान

 सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच मुरघास निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनाकरिता अनुदान दिले जाणारा असून शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये उद्योजक बनण्यास खूप मोठी मदत होणार आहे. या अभियानाचा विचार केला तर केंद्र सरकारने 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत  या क्षेत्रातील विविध योजनांचे एकत्रीकरण करून सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले होते.

त्याच्यानंतर यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली असून याला सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानाचे नाव दिले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अभियानाचा खूप मोठा फायदा होणार आहे.

 सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत किती मिळेल अनुदान?

 यामध्ये पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपअभियानाच्या माध्यमातून शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच मुरघासाची निर्मिती आणि वैरण बियाणे उत्पादनाकरिता प्रत्येकी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यानुसार 100 शेळ्याकरिता दहा लाख, दोनशे शेळ्यांकरिता वीस लाख, तीनशे शेळ्यांकरिता तीस लाख, 400 शेळ्यांकरिता चाळीस लाख आणि 500 शेळ्यांकरिता 50 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. 

एवढेच नाही तर कुक्कुटपालनाकरिता प्रत्येकी कमीत कमी 25 लाख तर वराह पालन योजना अंतर्गत 50 वराहासाठी कमाल 15 लाख हे शंभर वराह साठी प्रत्येकी 30 लाख रुपयांच्या अनुदान या माध्यमातून देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या अभियानांतर्गत मूरघास व वैरण विकास प्रकल्पांकरिता देखील प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान शेतकऱ्यांना नक्कीच वरदान ठरेल अशी शक्यता आहे.

English Summary: A golden opportunity to become an entrepreneur by getting a subsidy of up to 50 lakhs Published on: 24 August 2023, 09:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters