आज शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवीन उपकरणांचा वापर करत शेतीमध्ये चांगले उत्पादन घेत आहे. सध्याच्या काळात शेतीसाठी आधुनिक उपकरणे आवश्यक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे.
सम (SMAM) या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून ५० ते ८० टक्के अनुदान आर्थिक सहाय्य स्वरूपात दिले जाणार आहे. आज आपण अर्ज प्रक्रिया, पात्रता कागदपत्र इत्यादींशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभांसाठी अर्ज करायचा आहे, तर ते योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज (online documents) करू शकतात. ही योजना 2022 पासून राबविली जात आहे.
ही योजना देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, देशातील कोणताही शेतकरी जो या SMAM किसान योजना 2022 साठी पात्र आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि महिला शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
दिवसाला फक्त 45 रुपये वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक; जीवन आनंद योजना देतेय संधी
केंद्र सरकारची कृषी यंत्र योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर अनुदान मिळू शकते. SMAM किसान योजना 2022 मध्ये, सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रे (Agricultural machinery) खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
या SMAM किसान योजना 2022 मुळे शेतकऱ्यांना उपलब्ध साधनसामुग्रीच्या साह्याने शेती करणे सोपे होणार असून शेतातील पिकांचे उत्पादनही अधिक होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. या योजनेच्या माध्यमातून सरकारने देशातील शेतकऱ्यांना चांगली उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करावी.
रात्री शांत झोप लागत नसेल तर एकदा 'हा' झोपेचा चहा प्या; मिळेल आरामदायक फायदा
SMAM किसान योजना 2022 चे फायदे
1) या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे.
2) या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीनुसार 50 ते 80 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
3) साम किसान योजना 2022 चा लाभ घेण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याला या योजनेअंतर्गत
4) सरकारकडून सबसिडी मिळू शकते.
5) या योजनेद्वारे शेतकरी शेतीची साधने सहज खरेदी करू शकतात.
6) उपकरणांच्या मदतीने पीक सुरक्षित ठेवता येते.
7) (SC, ST, OBC) वर्गाला या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे.
8) या योजनेचा लाभ सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारे दिला जाणार आहे.
9) सम किसान योजनेच्या आधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
महत्वाच्या बातम्या
रब्बी हंगामात आंतरपीक पद्धतीने करा शेती; मिळेल दुप्पट फायदा
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; किती मिळतोय सोयबिनला बाजारभाव? जाणून घ्या
आता लवकरच शेतकऱ्यांना जांभळ्या टोमॅटोची लागवड करता येणार; टोमॅटोची नवीन जात विकसित
Published on: 20 September 2022, 02:20 IST