सध्या राज्यात नव्याने १०२३ शेततळ्यांची खोदाई करणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई करण्यासाठी ४६ कोटी रुपये विविध जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
पावसामुळे नव्या शेततळ्यांची खोदाई शेतकऱ्यांनी तूर्त थांबवली आहे. मात्र दिवाळीनंतर या योजनेला पुन्हा गती मिळेल. कृषी आयुक्तालयाने या योजनेतील ऑनलाइन त्रुटींचा अभ्यास करीत त्या दूर केल्या आहेत.
त्यामुळे योजनेत सुटसुटीतपणा आला आहे. दरम्यान, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले व सहसंचालक पांडुरंग शेळके यांच्याकडून शेततळे योजनेला वेग देण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे.
शेतकऱ्यांनी १७०० शेततळ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली आहेत. यातील ५०० तळ्यांचे अनुदान अदा करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेततळे खोदाईत पुणे विभाग आघाडीवर आहेत.
कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडून आयुक्तालयापासून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या योजनेचा पाठपुरावा सुरू आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय. राज्यात शेततळ्यासाठी ५५ हजार शेतकऱ्यांना सोडत लागलेली आहे.
त्यापैकी १५ हजार शेतकऱ्यांनी तळे खोदाईची तयारी दर्शविली. दरम्यान, शेततळ्यांसाठी जिल्हानिहाय देण्यात आलेले अनुदान वापरले न गेल्यास निधी परत जात नाही. त्याऐवजी शिल्लक निधी गरज असलेल्या जिल्ह्यांना पाठविला जात आहे.
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
सदाभाऊ टोमॅटोच्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांवर भडकले, म्हणाले थोड्या दिवसांनी सरण रचायलाही टोमॅटो देऊ...
Share your comments