पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये देते. पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून १० कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात १२व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर आता शेतकरी आतुरतेने १३व्या हप्ता कधी येणार याची वाट पहात आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.
सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत (Prime Minister Kisan Sanman Nidhi) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी (farmers) ई-केवायसी (e KYC) आधार अनिवार्य केले आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e KYC) पूर्ण केल्यावरच त्यांना हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ हप्ते जमा झालेत आणि आता १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
टोमॅटोचे प्रगत वाण, कमाल उत्पादन क्षमता 900 क्विंटल प्रति हेक्टर
'या' दिवशी होणार हप्ता जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३वा हप्ता २७ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना १२वा हप्ता मिळाला नव्हता. आता त्या शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याची आणि १३व्या हप्त्याची रक्कम मिळून ४ हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत.
तैवानच्या टरबूजाच्या शेतीतून 4 महिन्यांत 60 लाखांची कमाई, जाणून घ्या शेतीची पद्धत
लाभार्थी स्थिती आणि पेमेंट तपशील असे तपासा -
1) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2) सर्वात वर 'फार्मर्स कॉर्नर' पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. येथे लाभार्थी स्थिती पर्याय निवडा, जिथे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
3) एक यादी असेल ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या बँक खात्यावर पाठवलेली रक्कम लिहिली जाईल.
पीएम किसान हेल्पलाइन नंबर -
यादीमध्ये नाव नसेल किंवा इतर काही अडचणी येत असल्यास या १५५२६१ / ०११-२४३००६०६ हेल्पलाईन नंबर वर कॉल करा.
Share your comments