जलजीवन मिशन अंतर्गत देशात 13 कोटी ग्रामीण भागातील नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. 'स्पीड आणि स्केल' सह काम करताना, जीवन बदलणारे मिशन ऑगस्ट २०१९ सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला या मिशन अंतर्गत केवळ 3.23 कोटी कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले होते. 4 वर्षांत यात वाढ झाली असून तो आकडा 13 कोटीपर्यंत वाढला आहे.
देशातील गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश आणि 3 केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली आणि अंदमान आणि निकोबार बेट या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. बिहार 96.39 टक्के, मिझोराम 92.12 टक्के या राज्यात काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
गोवा, हरियाणा, पंजाब, अंदमान आणि निकोबार बेटे, पुडुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव ही 'हर घर जल' प्रमाणित राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये, ग्रामसभांद्वारे ग्रामस्थांनी पुष्टी केली आहे, की तेथे गावातील 'सर्व घरांना आणि सार्वजनिक संस्थांना' पुरेसा, सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा होतो आहे. देशातील 145 जिल्हे आणि 1,86,818 गावांत 100 टक्के झाले आहे.
दरम्यान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीत कार्यक्रम राबवला जात आहे. एकत्रित प्रयत्नांमुळेच परिवर्तनीय बदल जमिनीवर दिसतो आहे. नळ कनेक्शन स्थापित केले जात आहे. जे देशाचे ग्रामीण परिदृश्य बदलत आहे. 1 जानेवारी 2023 पासून दररोज सरासरी 87,500 नळ जोडणी दिली जात आहेत. जानेवारी 2023 पासून 61.05 लाख थेट घरगुती टॅप कनेक्शन (FHTC) प्रदान करून उत्तर प्रदेश चालू आर्थिक वर्षात प्रगती चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे.
Share your comments