शेतीच्या कामांमध्ये सुलभता यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अगोदर परंपरागत पद्धतीने शेती केली जात होती त्यामध्ये श्रम आणि वेळ अधिक जात होता. परंतु आता हळूहळू शेतीमध्ये आधुनिक कृषी यंत्रांचा वापर होत असल्यामुळे शेतीची कामे करणे सोपे झाले आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून आता शेतीमध्ये ड्रोन चा उपयोग करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. विदेशामध्ये ड्रोन चा प्रयोग बऱ्याच दिवसापासून शेतीच्या कामासाठी करण्यात येत आहे. परंतु भारतात त्याचे प्रमाण कमी आहे. आता काही दिवसांपूर्वी जबलपूर येथील एक तरुण इंजीनियर ने लागवडीसाठी ड्रोन चा उपयोग करून सर्वांना चकीत केले आहे. त्यांनी असा ड्रोन बनवला आहे की त्याच्यामध्ये बियाणे लोड केले तर ते पूर्ण शेतामध्ये त्याची लागवड करते. जबलपूर मधील माढाताला येथे राहणारे अभिनव ठाकूर यांनी असा ड्रोन तयार केला आहे की बियाणे लागवडीचे काम फार सोपे करून शेतकऱ्यांना मदत केली आहे. अभिनव ठाकूर यांनी बी एच यू च्या वैज्ञानिकांच्या आग्रहाखातर या ड्रोन चा प्रयोग मिर्जापुर येथील शेतामध्ये करून दाखवला.
ड्रोन द्वारे शेती: जाणून घेऊया या ड्रोन ची वैशिष्ट्ये
या ड्रोनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ड्रोनचे तीस किलो वजन सहन करण्याची क्षमता आहे. त्यामध्ये एक टॅंक फिट केली आहे ज्यामध्ये धान किंवा गहू बियाणे लोड केले जाते. त्यानंतर हे ड्रोन शेताच्या वरून उडवून ते ड्रोन बियाणे सरीमध्ये व्यवस्थित टाकते.
ड्रोन कसे काम करते?
याबाबतीत अभिनव यांनी सांगितले की उत्तर प्रदेशमध्ये बर्याचशा जिल्ह्यांमध्ये भाताची कापणी झाल्यानंतर वातावरणात गारवा येतो. त्यामुळे तेथील शेत पूर्णपणे सुखत नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टर किंवा सी ड्रिल च्या साह्याने गव्हाची लागवड करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे अभिनव यांनी ही समस्या ओळखून त्यांनी बनवलेल्या ड्रोन ला मॉडीफाय केले. त्यामध्ये असलेल्या टाकीच्या खाली सीड ड्रील सारखे होल फनल जोडून त्याच्या साह्याने बियाणे पेरणी केली जाते.
ड्रोन कसा ऑपरेट करतात?
अभिनव यांच्यामध्ये हे ड्रोन ऑपरेट करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईल किंवा टॅबलेट मध्ये गुगल मॅप च्या साह्याने शेताचा नकाशा फीड करावा लागतो. त्यानंतर सुरुवात करून लोड केलेले बियाणे किंवा बॅटरी संपत नाही तोपर्यंत लोड केलेल्या नकाशाप्रमाणे त्या शेताच्या क्षेत्रात बियाणे लागवडीचे काम करते आणि बियाणे किंवा बॅटरी संपल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या जागेवर लँड होऊन थांबते.
या ड्रोनचे शेतीसाठी होणारे फायदे
ड्रोन च्या सहाय्याने लागवड करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना शेतात ही जाण्याची गरज नाही. या ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी शेताच्या एका कोपऱ्यात उभे राहून लागवड करू शकतात.
सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या ड्रोनच्या फनेल द्वारे आवश्यक तेवढेच बियाणे टाकले जाते त्यामुळे बियाण्याची नासधूस थांबते. तसेच हा ड्रोन मॅप च्या साह्याने दाखवलेल्या दिशेतच चालते त्यामुळे बियाणे सारख्या अंतरावर पेरले जाते त्यामुळे उगवणारी पिके एका लाईन मध्ये उगते.
कीटकनाशक फवारणी साठी होईल ड्रोनचा वापर
मागच्या वर्षी दोन हजार वीस मध्ये राजस्थान मधील टिड्डी ( नाकतोडा ) आक्रमणाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले होते. 2 चा वापर प्रामुख्याने उंच असलेल्या ठिकाणी फवारणीसाठी केला जातो कारण अशा ठिकाणी माऊंटेड स्प्रेयर पोहोचू शकत नाही. ड्रोनच्या साह्याने एका तासात दहा एकर क्षेत्रामध्ये कीटकनाशक फवारले जाते.
Share your comments