1. यांत्रिकीकरण

शेतीच्या कामात उपयोगी येणारा ट्रॉली पंप ; बळीराजाचा खर्च होणार कमी

सध्याची परिस्थिती पाहता अधिक उत्पन्नाची गरज आहे. अशात शेतीची कामे लवकर झाली तरच उत्पन्न अधिक होईल यात शंका नाही. शेतीची कामे लवकर होण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यंत्रांचा वापर आपल्या शेतात केला पाहिजे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सध्याची परिस्थिती पाहता अधिक उत्पन्नाची गरज आहे. अशात शेतीची कामे लवकर झाली तरच उत्पन्न अधिक होईल यात शंका नाही. शेतीची कामे लवकर होण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त यंत्रांचा वापर आपल्या शेतात केला पाहिजे. यातून शेतकऱ्यांची कमाईही वाढते. अनेक शेतकरी आधुनिक तंत्राने बनवलेले कृषी यंत्राचा उपयोग शेतीच्या् कामासाठी करतात. या यंत्राच्या साहाय्याने अनेक शेतकरी आपले उत्पन्न वाढत आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच एका यंत्राविषयी माहिती देत आहोत. ज्या यंत्राच्या साहाय्याने आपल्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.  या कृषी यंत्राचे नाव आहे ट्रॉली पंप, हे यंत्र शेतीच्या कामासाठी खुप उपयोगी आहे.

काय आहे ट्रॉली पंप -

हे यंत्र अशा शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे, ज्यांच्याकडे अनेक बिघा शेत जमीन आहे. या यंत्राच्या साहाय्याने आपण पिकांवर कीटकनाशकांची फरवाणी करू शकता. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ वाचणार आहे. दोघांची बचत होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. यामुळे आपोआप शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

काय आहे ट्रॉली पंपची किंमत

तुमच्या मनात नक्की हा प्रश्न आला असेल. या पंपची किंमत थोडी जास्त आहे, पण यंत्राची उपयोगिता पाहता ही किंमत कमी वाटते. बाजारात अनेक प्रकारचे ट्रॉली उपलब्ध आहेत. ही एक पोर्टेबल ट्रॉली व ट्रॉली प्रकार स्प्रे पंप आहे. याची किंमत ही साधरण ४० ते ४५ हजाराच्या आसपास आहे. या ट्रॉली पंपमध्ये स्पॅरमॅन -पीटी २००, टॉली टाईप २००, एलटीआरएबल स्प्रेडर, यात होंडा जीएक्स ८० इंजिन आहे. बाजारात याची किंमत ४५ हजार रुपये आहे. याशिवाय  मॅरेथॉन जीईसी मोटरीसह स्पॅरमॅन - पीटी २०० एम ट्रॉलीचा प्रकरा २०० लीटर फरवाणी करणाऱ्या यंत्राची किंमत ही ३५ हजार रुपये आहे.

English Summary: trolley pump useful for farm work; farme can save his money Published on: 04 July 2020, 11:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters