शेतीच्या मशागतीची कामे ही आता यंत्राने केली जात आहेत. यामुळे कामाची गती वाढून उत्पादनातही वाढ झाली आहे. यंत्रांमुळे कामे सोपी झाल्याने शेतकऱ्यांचे कष्ट वाचले आहेत. उन्हाळ्यात अनेक शेतकरी आपल्या शेतात गाजरची शेती करतात. यात लागवड करताना शेतकऱ्यांना अधिक कष्ट करावे लागतात. आज आपण अशाच एका यंत्रांची माहिती घेणार आहोत ज्याच्या उपयोगाने आपले कष्ट वाचणार आहेत. सध्या पावसाळा चालू आहे, पण काय लेखाचा अर्थ असा आपल्याला वाटले असेल. पण जर आपण आधीच पुढीच्या गोष्टीची तयारी करुन ठेवली तर ऐनवेळी तारांबळ होणार नाही. यंत्राच्या मदतीने शेतीची कामे सोपी होत असतात, यासह वेळ आणि पैसा दोघे वाचतात.
बेड प्लांटर आणि मल्टी क्रॉप लागवड मशीन -
वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा पेरणीची वेळ निघून जात असते. वेळे चुकल्याने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत असतो. यामुळे वेळेत पेरणी किंवा लागवड झाली पाहिजे. यामुळे वेळेत पेरणी करण्यासाठी आपण त्यापद्धतीची तयारीही केली पाहिजे. हे यंत्र आपण घेतले तर हे आपण्यास खूप उपयोगी पडेल. कमी वेळेत अधिक काम करण्याची क्षमता या मशीममध्ये आहे. हे मशीन हरियाणातील महावीर प्रसाद जांगडा यांनी तयार केली आहे.
या मशीनच्या मदतीने लागवडीसह मेड बनवली जाते. या पिकांच्या लागवड सोपी होते. या यंत्राने फक्त गाजरच नव्हे तर कांदा, मुळा, पालक, कोंथिबीर, तूर, मूग डाळ, गहू, मटर मका, हरभरा, भेंडी, टोमॉटो, फोलकोबी आदी पिकांचीही लागवड केली जाते.
यासह गाजर धुण्यासाठी बाजारात एक यंत्र आहे. बाजारात गाजर घेऊन जायचे असतील तर तेव्हा गाजरे आपल्याला धुवावी लागतात. यासाठी एक यंत्र आहे. यातून धुण्याचे काम खूप सोपे होत असते. यामुळे मजूराचा खर्चही वाचत असतो.
गाजर धुवत असताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नसते, त्यांच्यासाठी ही मशीन फार महत्त्वाची असते. या यंत्राने गाजरासह, आले, हळद सारख्या पिकेही धुतली जातात. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरच्या मदतीने कुठेही नेता येते. जर आपल्या गाजराची शेती करायची आहे, यात यंत्राचा उपयोग करायचा असेल तर आपण यंत्र बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क करावा.
Share your comments