माती परीक्षण हे शेती क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा असून माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जमिनीचे आरोग्य समजते. आपल्याला माती परीक्षण विषयी माहिती आहे की, बरेच शेतकरी बंधू माती परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामागे कारण देखील असेच आहे. माती परीक्षण करण्यासाठी काही प्रमाणात माती टेस्टिंग करण्यासाठी लॅबमध्ये पाठवावे लागते व त्या ठिकाणी मातीचे परीक्षण केले जाते.
यानंतर संबंधित मातीचा रिपोर्ट यायला कमीत कमी एक आठवडा जातो. परंतु आता या समस्येपासून मुक्तता मिळणार असून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाइलच्या माध्यमातून काही मिनिटात माती परीक्षण करू शकतात.
आयआयटी कानपूर येथील संस्थेने तयार केलेली पोर्टेबल कीट
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आयआयटी कानपुरने माती परीक्षणासाठी तयार केली आहे. या पोर्टेबल किटच्या माध्यमातून माती परीक्षण अधिक जलदगतीने व अचूक केले जाऊ शकते असा या संस्थेने दावा केला आहे.
यासाठी तुम्हाला पाच ग्रॅम मातीची आवश्यकता भासणार असून या मातीचे परीक्षण तुम्ही या पोर्टेबल किटच्या साह्याने एक मिनिट आणि तीस सेकंदात यासंबंधीचा रिपोर्ट मिळवू शकतात.
नक्की वाचा:Fertilizer: कोंबडी खताचा 'अशा' पद्धतीने कराल वापर तर पिकांना ठरेल वरदान, येईल पीक जोमदार
या किटची कार्यपद्धती
या पोर्टेबल किटमध्ये माती परीक्षण करण्यासाठी 5 ग्रॅम माती परीक्षानळी सारख्या दिसणाऱ्या यंत्रात टाकावी लागणार आहे. या यंत्राला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली गेली आहे. या ब्लूटूथच्या माध्यमातून या पोर्टेबल किटला मोबाईलशी कनेक्ट करावे लागणार आहे. यासाठी मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागणार असून प्ले स्टोअर डाऊनलोड करू शकतात.
या एप्सचे नाव भु परिरक्षक असे आहे. आपण परीक्षानळी मध्ये माती टाकल्यानंतर केवळ 90 सेकंदात या मोबाईलवर या ॲपच्या माध्यमातून माती परीक्षणाचा रिपोर्ट येऊन जातो. या माध्यमातून आपल्याला मातीतील सहा घटकांचे माहिती समजते.नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रिय कर्ब यांचादेखील समावेश आहे की नाही हेदेखील कळते.
नक्की वाचा:जाणून घ्या पपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोग आणि त्याचे व्यवस्थापन
Share your comments