MFOI 2024 Road Show
  1. यांत्रिकीकरण

जमिनीची मशागतीसाठी उपयुक्त असलेल्या रोटावेटरची अशी करा देखभाल

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तसेच औद्योगिक क्षेत्रात मनुष्याची जागा यंत्राने घेतली आहे. याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही.

KJ Staff
KJ Staff


सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तसेच औद्योगिक क्षेत्रात मनुष्याची जागा यंत्राने घेतली आहे. याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटाव्हेटरचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. परंतु आपण बऱ्याचदा फक्त त्याचा वापर करतो परंतु पाहिजे तेवढे काळजी घेत नाहीत किंवा त्याबाबत निघा ठेवत नाहीत. परिणामी संबंधित यंत्राचे आयुष्य कमी होते. त्यामुळे रोटावेटरची निगा कशी ठेवायची याबाबत माहिती आपण घेणार आहोत.

 रोटावेटरची देखभाल कशी ठेवावी

  • रोटाव्हेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्वे ग्रीसिंग पॉईंट्स ग्रीस लावावे.
  •  गिअर बॉक्समधील वंगन ऑइलची पातळी तपासावी आणि ते कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑइल घालावे.  ऑइल  संपले असल्यास ते बदलावे.
  • रोटावेटरची पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती वाकडी किंवा मोडली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावी.
  • चेन पॉकेट वचेन केसमधील ओईल तपासावे आणि साडेचारशे तास वापरल्यावर ऑइल बदलावे.
  • चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा.
  • रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट बोल्ट घट्ट आवळा वित.
  •   रोटावेटरचा वापर करण्यापूर्वी करायच्या प्राथमिक तपासणी.
  • पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट बोल्ट तपासून घट्ट करावेत.
  • गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे.
  • ऑइल टाकीच्या तळाशी असलेल्या लेव्हल काठीच्या साह्याने तपासून ऑइलची पातळी योग्य प्रमाणात तपासून ऑईलची पातळी योग्य प्रमाणात ठेवावी ठेवावी.  
  • नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट बोल्ट ट्रॅक्टर सोबत दिलेल्या अवजारांचे पेटीत आहे याची खात्री करून घ्यावी.
  • रोटावेटर ट्रॅक्टरला जोडताना सर्व लिंक्स व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.
  • प्रत्यक्ष शेतात काम सुरू असताना घ्यावयाची काळजी.  रोटावेटर शेतात वापरताना अथवा वाहतुकीच्या वेळी तो 10 ते 15 सेंटिमीटर पेक्षा सहसा जास्त उचलू नये.कारण पीटीओ शाफ्ट व कार्डेन शाफ्ट यामधील कोण ती संशोधनपेक्षा जास्त असता कामा नये.
  • पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओच्या वेगावर आधारित असल्याने एक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा.
  • माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गियरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.

English Summary: This is how to maintain a rotavator suitable for tillage Published on: 25 August 2020, 05:20 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters