जर आपल्याला शेतीतून अधिक कमाई करायची असेल तर शेतीच्या मशागतीचे कामे लवकर झाली पाहिजे. ही कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी अवजारांची अवश्यकता असते. आजच्या या लेखा आपण अशाच काही अवजारांविषयी माहिती घेणार आहोत.
(Roto Seed Drill)
रोटे सीड ड्रिल - याच्या वापराने इंधनाची बचत होते. यासह मातीचा ओलावा साबूत ठेवते. बियाणे आणि उर्वरक शेतात टाकता येते. या अवजाराची किंमत ही साधरण ५० हजार रुपयांपासून सुरु होते. दरम्यान या अवजारावरती अनुदान देखील मिळते.
(Planter) प्लांटर - पेरणी करण्यासाठी या अवजाराचा उपयोग केला जातो. ट्रॅक्टरच्यामागे जोडून आपण शेतात पेरणी करु शकतो.
स्प्रेअर (Sprayer)
पिकांवर फरवाणीसाठी वापरण्यात येते. हे मशीन अनेक वेगवेगळ्या प्रकारात निर्मित करण्यात आले आहे. अनेक पिकांवर फवारणीसाठी याचा उपयोग केला जातो. या मशीनच्या प्रकरात स्प्रेअर, पोर्टेबल पॉवर, स्प्रेअर, नॅकपॅक पावर स्प्रेअर, मिस्ट डस्ट स्प्रेअर आदींचा समावेश होतो. यांची किंमतही साधरण ३५०० पासून सुरु होत ५० हजार रुपयांपर्यत असते.
स्ट्रॉ-रीपर (Straw Reaper)
ही मशीन भूसा बनविण्याच्या कामासाठी उपयोगात येते. या यंत्राच्या साहाय्याने शेतात पिकांचे अवशेष साफ केले जाते. याला ट्रॅक्टर द्वारे चालविले जाते. याची किंमत ही साधरण २ लाख ५० हजार ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत असते. यावर साधणर ५० हजारापर्यंतची सूट असते.
Share your comments