देशाच्या जीडीपीच्या वाढीमध्ये कृषी क्षेत्राचे मोठा वाटा असतो. याससह कोट्यवधी लोकांची भूकही कृषी क्षेत्र भागवत असते. यामुळे चांगले उत्पन्न मिळावे, भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी लोक नाविन्यपूर्ण लागवडची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. उत्पन्न अधिक मिळावे यासाठी शेतकरी भौगोलिक / हवामान संबंधित माहिती घेण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर शेतीत डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून अलीकडच्या काळात डिजिटलला पद्धतीला वेग आला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून, शेती अधिक सोपी, फायदेशीर, कार्यक्षम आणि अधिक सुरक्षित बनत आहे. अनेक प्रकारचे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात आले आहे. पण खालील देण्यात आलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त आहे.
(GIS software and GPS agriculture) जीआयएस सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती
(Satellite imagery) उपग्रह प्रतिमा
(Drone and other aerial imagery) - ड्रोन आणि इतर हवाई प्रतिमा
( Farming software and online data) शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डेटा
( Merging datasets) मर्जिन डेटासेट
GIS software and GPS agriculture
शेतीतील अचूकतेसाठी हे सॉफ्टवेअर फार फायदेशीर आहे. जे लोक पर्जन्यमान, तापमान, पीक उत्पन्न, वनस्पतींचे आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हे फार फायदेशीर आहे.
Satellite Imagery: या उपग्रह आणि ड्रोनद्वारे फोटो किंवा मौल्यवान डेटा संग्रह केला जातो. हा डेटा वनस्पती, मातीची स्थिती, हवामानाविषयी अचूक अंदाज यातून घेता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज सहजपणे घेता येतो. पिकाशी निगडित विविध प्रकारचे धोक्याचे कारणे शोधण्याचे उद्दीष्ट ठेवून रीअल-टाइम शेतात देखरेख देखील करता येते. पिकांवर या उपग्रहाच्या साहाय्याने नजर ठेवता येते. याच्यातून आपल्या पुढील धोक्याविषयी माहिती मिळते आणि शेतातील पिकांवर कोणत्या प्रकारचे रोग आले आहेत याची माहिती होते.
Drone/Aerial Imagery:
यात ड्रोनच्या साहाय्याने शेतांचे फोटो घेतले जातात. पीकांचे बायोमास, पिकांची उंची, शेतातील पिकासाठी तण उपस्थितीसह पाण्याची संपृक्तता याची अचूकतेविषयी शेतकऱ्यांना अंदाज मिळत असतो. ड्रोन मार्फत घेण्यात आलेले फोटो हे उपग्रहाने घेतलेल्या फोटोंपेक्षा अधिक फायदेशीर असतात. ड्रोनच्या माध्यमातून मिळालेली माहिती ही फायदेशीर असते. शिवाय आळ्याचा, कीटकांचा हल्ला झाल्यानंतर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. यामुळे अखेरीस रासायनिक नियंत्रण पद्धती लागू होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे पिकाच्या वाढीवर किंवा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
(Farming software and online data) शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डेटा
हे शेतावर आधारित सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये उपग्रह प्रतिमांमधून प्राप्त पिकांच्या स्थितीवरील डेटासह हवामानाच्या डेटाचे विश्लेषण केले जाऊ शकते. याच्या मदतीने शेतकरी अचूकपणे सिंचन लागू करू शकतात. दव किंवा उष्णतेचे नुकसान रोखू शकतात.
(Merging datasets) मर्जिन डेटासेट्स - हे पिकांच्या देखरेखीसाठी वापरले जाते. आपली शेती कशी आहे याची माहिती घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जिल्ह्यातील इतर शेताच्या तुलनेत आपले शेत कसे आहे याची माहितीसाठी हे उपयोगाचे आहे. हवामान संदर्भात माहिती देण्यासाठीही याचा उपयोग होत असतो. उदा. डेटा सिस्टम एखाद्या संशोधकास कमी तापमानाबद्दल, हिवाळ्याच्या हंगामात पेरलेल्या पिकांसाठी हानिकारक सूचित करू शकते. वरती दिलेल्या तंत्रज्ञानाने आपल्या शेतीला नक्कीच फायदा होईल. शेती व्यवसायात डिजिटलचा उपयोग झाल्यास आपले उत्पन्न वाढण्यासही फायदा होईल.
Share your comments