शेती व्यवसायात सर्वाधिक उपयोगी यंत्र म्हणजे पॉवर टिलर. मशागतीसाठी पॉवर टिलरची खूप मदत असते आणि शेतीचे काम अगदी चोख होत असतात. आज आपण या लेखात सर्वोत्तम असलेल्या दोन टिलर्सची माहिती घेणार आहोत. किर्लोस्कर का KMW मेगा T15 डिलक्स (KMW Mega T15 Deluxe by Kirloskar) - या कंपनीचे टिलरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात १५ एचपी इंजिन असून याच्या साहाय्याने शेतीची कामे सहजगत्या होत असतात.
ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीवर काम करण्यास सक्षम आहे. याला असलेले ब्रेक आणि बसण्यासाठी असलेल्या सीटामुळे चालक व्यवस्थितरित्या याचा उपयोग करू शकतो. विशेष म्हणजे या यंत्राचे आय़ुष्य खूप आहे.
कुबोटा 140DI ( Kubota 140DI)
हे RT140DM सह येत असते, जे खूप शक्तीशाली आहे आणि उच्च RPM मध्ये काम करण्यास सक्षम आहे. याला असलेल्या 80cms च्या रुंद रोटरी पृथ्वीच्या पल्सरीकरणाची शक्ती वाढवते.
या टिलरला वळणदार रोटरी पाते (ब्लेड)देण्यात आले आहेत. जे कोरड्या जागेत १२ सेंमी तर मोकळ्या जागेत १५ सेंमीपर्यंतच्या मातीला भुसभुसती करु शकते. ओल्या आणि कोरड्या या दोन्ही प्रकारच्या जमिनीवर काम करण्यासाठी हे टिलर उपयोगी आहे. याचे ब्लेड वारंवार बदलण्याची गरज नसते.
होंडा FJ500 पॉवर टिलर (Honda FJ500 Power Tiller)
शेतकरी बांधव या टिलरच सर्वात जास्त उपयोग करत असतात.
कोरड्या व अर्ध-शुष्क भागात तणनियंत्रणात त्यांचा प्रभावीपणे वापर केला जातो. यात 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. शेतात आणि बागांमध्ये हे वापरणे खूप सोपे आहे. दरम्यान या कंपनीच्या टिलरच्या देखभालीचा खर्च कमी असून याची गुणवत्ता आहे. या टिलरला तेज ब्लेड पाते बसविण्यात आले आहे.
Share your comments