शेतीमध्ये सध्या यांत्रिकीकरणाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. दिवसेंदिवस शेतकरी आधुनिक शेतीकडे आणि तंत्रज्ञान युक्त शेती करताना दिसत आहे. शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्याने वेळेची आणि पैशांची चांगल्या प्रमाणात बचत होते.
तसेच वेगवेगळ्या तंत्रांचा शेतात वापर केल्याने कष्ट हे कमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दिमतीला विविध प्रकारचे यंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी या लेखामध्ये आपण कृषी वेटर या वैविध्यपूर्ण यंत्राची माहिती घेणार आहोत.
कृषी वेटर
कृषी वेटर हे रोटावेटरचे विकसित व सुधारित स्वरूप असून तांत्रिक वैशिष्टे व उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रमाणाच्या आधारे त्याची व्यावसायिक निर्मिती केली जाते. कृषी वेटर हे देशभर उपलब्ध आहे. कृषी वेटरसाठी तीन प्रकारची पाती वापरले जातातव उपलब्ध ट्रॅक्टर व कामाच्या गरजेनुसार तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग नियंत्रित करता येतो.
कृषी वेटरची उपयुक्तता
-
या यंत्राद्वारे पेरणीसाठी जमिनीची जलद गतीने मशागत करता येते. कृषी वेटर द्वारे कुळवणे, ढेकळे फोडणे, सपाटीकरण करणे इत्यादी कामे सहजरीत्या करता येतात.
-
कृषी वेटरच्या साह्याने फोर खोडक्यांचा बारीक भुगा केला जातो व तो पूर्णतः मातीमध्ये मिसळला गेल्याने त्याच्या पासून सेंद्रिय खत तयार होते. त्यामुळे तर नियंत्रण देखील होते.
-
आंतरमशागतीसाठी व भाताच्या चिखलणीसाठी कृषी वेटर उपयुक्त आहे.
-
शेणखताच्या योग्यप्रकारे मातीत मिश्रणासाठी कृषी वेटर हे यंत्र उपयुक्त आहे.
या यंत्राचे वैशिष्ट्ये
- उच्च एचपी ट्रॅक्टरसाठी संपूर्ण गेअर ड्राईव्ह ट्रान्समिशनवाले व कमी एचपी ट्रॅक्टरसाठी चैन ड्राईव्ह ट्रान्समिशन असलेले कृषी वेटर उपलब्ध आहेत.
- या यंत्राचा शाफ्ट हा सर्व ट्रॅक्टरच्या मॉडेल्सना आणि पेटी ओ स्पीड आलाचालेल अशा टेलिस्कोपिक कार्डंन शाफ्ट आहे
- कृषी वेटर यंत्राचे फायदे
- या यंत्राच्या वापराने जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के खर्चाची बचत होते तसेच 60 ते 64 टक्के वेळेची बचत होते. इंधनाचा विचार केला तर त्यामध्ये देखील 18 ते 39 टक्के बचत होते.
- जर कृषी वेटर या यंत्राचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर जवळ जवळ दोन हंगामातच कृषी वेटरसाठी गुंतवलेली रक्कम वसूल होते.
- या यंत्राची निर्मिती ही तांत्रिक प्राविण्य व सर्वोत्तम अभियांत्रिकी मूल्यं द्वारे करण्यात आली आहे.
Share your comments