MFOI 2024 Road Show
  1. यांत्रिकीकरण

आता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सॉल्यूशन

मुंबई: राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अंदाजे १.०० लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर सातारा जिल्हा कांदा पिकवण्याबाबत प्रसिद्ध आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादित केला जातो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मुंबई : राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अंदाजे १.००  लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते.  महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर सातारा जिल्हा कांदा पिकवण्याबाबत प्रसिद्ध आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादित केला जातो. पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा दरामुळे रडवत असतो.  पण टाटा स्टील कंपनी अशा शेतकऱ्यांचे दुख दूर करणार आहे.  टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सॉल्यूशंस ब्रांड नेस्ट - इनने देशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक क्रांतिकारी सॉल्यूशन एग्रोनेस्ट लॉन्च केले आहे.

यामुळे बऱ्य़ाच प्रमाणात कांदा व्यवस्थित ठेवता येणार आहे.  कांद्यासाठी बनविण्यात आलेले हे पहिले स्मार्ट वेअरहाऊस आहे. यात विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. साठवणूक करण्याची पद्धतीत कमरतता आणि निकृष्ट पद्धतीचे आरखड्यासाठी वापण्यात आलेलेल साहित्य यामुळे जवळजवळ शेतकऱ्यांचा ४० टक्के कांदा गोदामात खराब होत असतो.

हवमानात झालेला अचानक बदल आणि वाहतूक आणि दळवळणातील आव्हाने यामुळे शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित ठेवण्यात अनेक अडचणी येत असतात. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची योग्य सोय नसते.  शेतकऱ्यांचा ही समस्या लक्षात घेत टाटा स्टीलच्या नेस्ट -इन आणि इनोव्हेट टीमने एक स्मार्ट वेअरहाऊस म्हणजे गोदाम सॉल्यूशन एग्रोनेस्ट विकसित केले आहे. याची रचना खुप आकर्षक आहे, अधिक प्रमाणात हवेची स्थिती नियंत्रित ठेवते. यात काही जागा असून कांदे अधिक काळासाठी सुरक्षित राहू शकतात.

हे गोदाम फार कमी प्रमाणात शेतमालाचे नुकसान होत असते. तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी  सेंसर लावण्यात आले आहे. जे माल खराब होण्याआधी आपल्याला सुचित करत असतात.   टाटा स्टीलचे प्रमुख (सर्व्हिसेस एंड सॉल्यूशस) पी आनंद म्हणतात की, भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भता  आणणे गरजेचे आहे. या गोष्टीने प्रेरित होऊन आमची एक्सपर्ट एग्रीकल्चर सेक्टरसाठी कस्टमासाइज्ड सॉल्सूशंस विकसीत केले आहे.

English Summary: Tata Steel’ Nest-In Launches Agronest, India’s First Smart Warehouse For Onion Storage Published on: 31 July 2020, 04:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters