पॉवर टिलर देणार शेतकऱ्यांना पॉवर ; शेतीचे कामे होतील सोपी

27 April 2020 04:09 PM


आता शेतीच्या कामांसाठी बैलांऐवजी यंत्राचा उपयोग केला जात आहे.  विशेष या यंत्रासाठी सरकारकडून आर्थिक मदत ही केली जाते. किंवा विविध योजनांच्या माध्यमातून हे यंत्रे दिली जातात. शेती करायची म्हटलं म्हणजे नांगरणी महत्त्वाची असते. त्यावरच पिकांचे उत्पन्न अवलंबून असते.  अशा कामासाठी पॉवर टिलर शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर आहे. आर्थिक परिस्थीती नसल्यामुले अनेक शेतकरी मोठी यंत्रे आणू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना पॉवर टिलर पॉवर देण्यास मदत करणार आहे.  बहुतेकवेळा सरकार पॉवर टिलरसाठी शेतकऱ्यांना मदतही करत असते.  हा पॉवर टिलर ( Power Tiller) फक्त नांगरणीच्या कामालाच  नाही तर खुरपणीसाठी म्हणजे तण काढण्यासही उपयुक्त आहे.  याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त होणारा खर्चही वाचणार आहे. 

(What is power tiller) पॉवर टिलर म्हणजे काय

हे एक शेती यंत्र आहे, जे शेताच्या नांगरणीपासून ते पिकाची कापणी पर्यंत खूप उपयुक्त आहे.  या मशीनद्वारे खुरपणी, सिंचन, काढणीसाठी उपयुक्त आहे.   नांगरात जशी पेरणी सरळ रेषेत केली जाते त्याचप्रमाणे या मशीनद्वारे पेरणी केली जाते.  विशेष गोष्ट अशी आहे की पॉवर टिलरमध्ये आणखी एक कृषी यंत्र जोडल्यास याची  बर्‍याच गोष्टींमध्ये मदत घेतली जाऊ शकते. पॉवर टिलर ट्रॅक्टरपेक्षा खूप हलका आणि याला चैन नसते.  बर्‍याच कंपन्या पॉवर टिलर बनवतात.  हे मशीन ऑपरेट करणे खूप सोपे आहे.  हे मशीन पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवर चालवता येते.

  • शेतकर्‍यांची बरीच कामे सुलभ होतात
  • हे यंत्र नांगरणी ते पेरणीसाठी उपयुक्त आहे.
  • पॉवर टिलरमध्ये वॉटर पंप टाकून शेतकरी तलावातील, आणि नदी इत्यादीमधून पाणी काढू शकतो.
  • थ्रेशर्स, कापणी करणारे, लागवड करणारे, बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र, इत्यादी देखील यात जोडल्या जाऊ शकतात.
  • पॉवर टिलर हे खूप हलके मशीन आहे, याची वाहतूक आपण कुठेही करु शकतो.

(Get government subsidy) पॉवर टिलरवर सरकारी अनुदान

सरकारकडून पॉवर ट्रिलर वर दोन प्रकारची सूट मिळते. 8 हॉर्सपावर के टिलर वर साधरण ४० टक्के सब्सिडी मिळते.  जर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील कोणी शेतकरी असेल तर त्याला ५० टक्के सब्सिडी मिळते.  या मशीनची किंमत ही साधरण १ लाख रुपये आहे.

कोणला मिळते सरकारी अनुदान

कोणताही शेतकरी पॉवर टिलर विकत घेऊ शकतो, परंतु शासनाने दिलेल्या अनुदानाचा लाभ फक्त अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो.  पॉवर टिलर घेताना शेतकऱ्यांना पुर्ण पैसे द्यावे लागतील, त्यानंतरच आपल्याला सरकारी सब्सिडीचा फायदा मिळू शकतो.  ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र घ्यायचे असेल तर  आपण आपल्या जिल्हा कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन याची नोंदणी करावी.  यासह कृषी विभागाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल. त्यानंतर कृषी विभाग आपल्याला संपर्क करेल.

machinery Subsidy on power tiller Government subsidy machinery Subsidy on power tiller Government subsidy Power tiller Agricultural machinery पॉवर टिलर पॉवर टिलरसाठी शासनाची सब्सिडी पॉवर टिलर कृषीसाठीचे मशनरी
English Summary: power tiller giver power to farmer ; farming will be easy

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.