श्री. माने, कृषी जागरणच्या ''द्राक्ष यांत्रिकीकरण- उत्पादन आणि नफा वाढवण्याची किल्ली'' या विषयावरील फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना द्राक्ष बागेत यंत्राचा वापर करुन अधिक नफा कसा मिळवला जाईल, याविषयीचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे येथील मुख्य शास्त्रज्ज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी शेतकऱ्यांना याविषयीचे मार्गदर्शन केले. फेसबुकच्या माध्यामातून झालेल्या या कार्यक्रमाला हजारो शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती लावली. द्राक्ष बागेची लागवड करताना शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येत असतात, याचा ऊहापोह करत माने सरांनी या बाग कामांमध्ये ट्रॅक्टर किती प्रभावीपणे काम करते याची माहिती दिली.
शेतकरी आणि महिंद्रा ट्रॅक्टरचं अतूट नातं
या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र माने म्हणाले की, शेतकरी महिंद्रा ट्रॅक्टरला आपल्याच घरातील व्यक्ती समजतात. या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांशी आपली एक भावनिक नाळ जोडली आहे. हीच भावनिक नाळ घट्ट करण्यासाठी महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने द्राक्ष बागायतदाराना लक्षात घेत जिवो 305 डी आय नावाचा ट्रॅ्क्टर बाजारात आणला आहे. महिंद्रा ट्रॅक्टरने विश्वासर्हता गुणवत्ता, विश्वसनियता या त्रिवेणी संगमचा नेहमी विचार केला आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्सला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी महिंद्रा ट्रॅक्टरवर दाखवलेला विश्वासामुळे आज आम्ही या उंचीवर आहोत.
हेही वाचा: पीएम किसान ट्रॅक्टर योजना, ट्रॅक्टर खरेदी वर 50 टक्के सबसिडी
ग्राहकांनी दाखवलेला विश्वासामुळे आमची छाती अभिमानाने फुगून जाते. या वर्षात कंपनीनेही ग्राहकांना विक्रीचे माध्यम समजलेले नसून त्यांना आपल्या जवळील व्यक्ती समजले आहे. आम्ही असे अनेक शेतकरी पाहिले आहेत, जे महिंद्रा ट्रॅक्टरला आपल्या घरातील व्यक्तीचं मानतात. महिंद्रा ट्रॅक्टरने शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट कशी झाली आहे. त्यांचे उत्पन्न कसे वाढले आहे, हे पाहिले आहे. अनेक शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून आपले डोळे भरून येत असतात. आपण एक चांगली वस्तू शेतकऱ्यांना दिल्याचा आनंद होत आमची छाती अभिमाने फुगून जातं असल्याचंही ते म्हणाले. माने सर, म्हणाले की महिंद्रा ट्रॅक्टरने विश्वास जिंकत शेतकऱ्यांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे.
बाग कामांमध्ये उपयोगी पडतो महिंद्रा ट्रॅक्टर
राज्यातील अनेक भागात द्राक्षांचे पीक घेतले जाते. परंतु सर्वाधिक उत्पन्न नाशिक आणि सागंली या जिल्ह्यात घेतले जाते. उत्पादित केलेल्या द्राक्षांच्या मालापैकी ८० टक्के माल हा वाईनयार्डला म्हणजेच वाईन बनविण्यासाठी वापरला जात असतो. १० टक्के रिटेल विक्रीसाठी तर १० टक्के मालावर प्रक्रिया केली जात असल्याचं माने सर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी द्रक्ष लागवडीच्या दोन पद्धतीविषयी सांगितलं. लागवड केल्यानंतर उत्पादित मालाची निर्यातीसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी महिंद्रा 305 जिवो डी आय ट्रॅक्टर मदत करत असतो.
निर्यातीसाठी द्राक्षांचा गुणवत्ता कशाप्रकारे सुधारला जातो
श्री. भालचंद्र माने म्हणाले, द्राक्षांसाठी देशातील बाजारपेठेप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पण आहे. नॉर्वे, युरोपियन देश, बेल्जियम, भारताच्या शेजारील देश, बांगलादेश, नेपाळ, आदी देशांमध्ये सरासरी दोन लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात होत असते. निर्यातीचा आकडा हा उत्पन्नानुसार कमी जास्त होत असतो. या निर्यातीमधून येणारी रक्कम अंदाजे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. पण निर्यातीचा उच्चांक गाठण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना काही पातळ्या पार कराव्या लागतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची निर्यातीसाठी गुणवत्ता राखली पाहिजे.
युरोपियन देशांनी गुणवत्तेचं काही मापदंड घालून दिलेले आहेत. ते मापदंड शेतकऱयांनी लक्षात ठेवली पाहिजेत. साधरण घडचे वजन ४०० ते ५०० ग्रॅम असले पाहिजे एका मनीचा व्यास १८ मीमीचं असला पाहिजे. फळाची गोडी १८ टक्के असली पाहिजे. द्राक्षांची ही गुणवत्ता सुधारण्याचं काम महिंद्रा जिवो 305 डीआय ट्रॅक्टर करते. हे ट्रॅक्टर त्याच्या पाठीवर असलेल्या स्प्रेअर पीटीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातीयोग्य माल मिळवून देत असतो.
माने सर म्हणतात, निर्यातीची मापदंड मिळवण्यसाठी द्राक्ष वेलीवरील स्प्रे खूप महत्त्वाचे असते. स्प्रेयिंगसाठी ट्रॅक्टर महत्त्वाचे आहे. हे स्प्रे युनिफॉर्म असलं पाहिजे. स्प्रे करताना औषधांची पोहच ही प्रत्येक वेली आणि प्रत्येक मनीपर्यंत असली पाहिजे. आधी पारंपारिक पद्धीतीचे स्प्रे वापरली जातं. आता अधिक सजग आणि चांगल्या प्रतीचे स्प्रे बाजारात उपलब्ध आहेत. लो वाल्यूम आणि हाय प्रेशरचं स्प्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. स्प्रे अधिक झाला तरी आपला माल निर्यातीयोग्य नसतो. कमी स्प्रे केल्यास उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. यामुळे मध्यम प्रतीने वेलीवर स्प्रे होणे आवश्यक आहे.
फवारणीसाठी असलेलं औषध साठवून ठेवलेल्या पीटीओ पंपाचे वजन सहजपणे उचलून धरण्याची क्षमता या महिंद्राच्या जिवो 305 डी आय ट्रॅक्टरकडे आहे. या क्षेणीतील ट्रॅक्टरमध्ये आपण सर्वोत्तम शक्ती 24.5 एचपीची दिलेली आहे. इतर कंपनीच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत हा ट्रॅक्टर सरस आहे. ग्राहकांशी महिंद्रा ट्रॅक्टरची असलेली भावनिक नाळ अधिक बळकट करण्यासाठी हा ट्रॅक्टर आणखीन एक पाऊल पुढे गेला आहे. बळीराजाच्या खिश्यातील पैसा डिझेलच्या रुपाने वाचवतो.
काय आहेत Jivo 305DI ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये
श्री, माने सर म्हणतात, महिंद्रा कंपनीचे हे ट्रॅक्टर एक अष्ट्रपैलू ट्रॅक्टर आहे. द्राक्ष उत्पादक, वाईनयार्ड्स, द्राक्ष बागेतील कामांसाठी हे ट्रॅक्टर बनविण्यात आले आहे. द्राक्ष बागेत काम करताना शेतकऱ्यांना काय अडचणी येत असतात. याची माहिती कंपनीतील जाणकार, अभियंते, निर्माते यांनी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना अपेक्षित असलेलं ट्रॅक्टर बनवले आहे. जिवो 305 डी आय हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे ट्रॅक्टर आहे. Jivo 305DI ट्रॅक्टर कमीत कमी किंमतीत दमदार शक्ती आणि मायलेज देतो. वाईनयार्ड्मध्ये सहजपणे चालणारा जमिनीशी जुडून राहणारा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना हवा असतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बनविण्यात आलेला हा ट्रॅक्टर डिझेलचा खर्च कमी करुन शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट करण्यास मदत करतो.
काय आहेत या ट्रॅक्टरचे इतर वैशिष्ट्ये
-
महिंद्रा जिवो 305 डीआय क्लचसह येते.
-
यात 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गिअरबॉक्सेस आहेत.
-
यासह, महिंद्रा JIVO 305 DI ची उत्कृष्ट किमी प्रति तास वेग आहे.
-
महिंद्रा जिवो 305 निर्मित.
-
महिंद्रा जिवो 305 डीआय स्टीयरिंग प्रकार गुळगुळीत पॉवर स्टीयरिंग स्टीयरिंग आहे.
-
हे शेतात दीर्घ तास करण्यासाठी उपयोगी असलेली इंधन टाकीची क्षमता मोठी असते.
-
महिंद्रा जिवो 305 डीआयमध्ये 750 किलो वजन खेचण्याची क्षमता आहे.
Share your comments