MFOI 2024 Road Show
  1. यांत्रिकीकरण

सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रांची जाणून घ्या किंमत

सुपारी हे पीक भारतासह , चीन तसेच दक्षिण पूर्व आशियातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे उष्ण कटिबंधीय पीक आहे. जागतिक चीन आणि बांगलादेशानेतर भारत हा सुपारी उत्पादनात आघाीवर आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

सुपारी हे  पीक  भारतासह , चीन तसेच दक्षिण पूर्व आशियातील व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे उष्ण कटिबंधीय पीक आहे.  जागतिक चीन आणि बांगलादेशानेतर भारत हा सुपारी उत्पादनात आघाीवर आहे.  देशातील कर्नाटक, केरळ, आसाम, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराच्या काही भागात लागवड केली जाते. दरम्यान आजच्या या लेखात आपण सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांविषयी माहिती घेणार आहोत.  सुपारीपासून विविध प्रकारचे पान मसाले, अडका किंवा कच तमुल, बाटेल्डिक, कालीपाक, चाळी सुपारी इत्यादी  तयार होतात. चामडे चमकवताना सुपारीतील टॅनिक वापरले जाते.

सुपारी स्वच्छ करणारे यंत्र  - कापणी झाल्यानंतर सुपारीवरील माती आणि अन्य पदार्थ दूर करुन सुपारी स्वच्छ केली जाते. यंत्राद्ववारे सुपारी स्वच्छ केली तर अर्ध्या तासात सुपारी स्वच्छ केली जाते. तर मनुष्यबळाचा वापर करुन सुपारी स्वच्छ केल्यास दिवसभरात फक्त ४०० सुपारी स्वच्छ होत असते. दरम्यान हे यंत्र लहान -मोठी माणसेही हाताळू शकतात. या यंत्राची किंमत ४५ ते ६० हजार रुपये आहे.

 


डिहस्किंग मशीन - सुपारीचे बाहेरील आवरण काढण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.  हे यंत्र स्वंयचलित यंत्रामुळे प्रति तास ७५ ते ४५० किलो सुपारीचे बाहेरील आवरण काढले जाते. यात फळाचे कोणतेच नुकसान होत नाही. बाजारात या यंत्राची किंमत ८५  हजार ते १.५  लाख इतकी आहे. 

 


सॉर्टिग मशीन - सुपारीची प्रतवारी करण्यासाठी हे यंत्र खूप उपयोगी असते.  मनुष्यबळाचा वापर करुन प्रतवारी केली तर वेळ अधिक लागत असते. दरम्यान यंत्रात दोन टप्पे  असून तीन छिद्राद्वारे सुपारीची विभागणी होते. प्रथम मोठ्या सुपारी चाळणीद्वारे विशिष्ट आकाराच्या सुपाऱ्या वेगळ्या केल्या जातात.  या यंत्रामध्ये  एक फिरत्या पटल छिद्रावर आधारित सोय असून त्याद्वारे आकारनुसार सुपारी वेगळ्या होतात.  या यंत्रामुळे प्रति तास सुमारे ६० किलो सुपारीचे आकारानुसार प्रतवारी केली जाते.  या यंत्राला १ एचपी विद्युत ऊर्जा लागत असते. या यंत्राची किंमत ६५ ते ८५ हजार इतकी आहे.

सुपारी उकडण्याचे  यंत्र -  सुपारीची आकार व रंगानुसार प्रतवारी झाल्याने कच्ची सुपारी उकडून त्यापासून लाल सुपारी तयार केली जाते.  बॉयलरचा वापर करुन सुपारी उकडली जाते, या यंत्राद्वारे प्रति तासात २०० किलो कच्ची सुपारी उकडली जाते. हे यंत्र ८५ हजारापासून बाजारात उपलब्ध आहे. सुपारी वाळण्यासाठी  वापरण्यात येणारे यंत्राची किंमत ही १ ते २.५ लाख इतकी आहे. या वेळेत २० ते १०० किलो सुपारी ५० ते ६५ अंश तापमानावर वाळवली जाते. 

 


पॉलीशर - सुपारीचा दर्जा व किंमत वाढविण्यासाठी  त्याला चकाकी आणणे आवश्यक असते.  त्यासाठी  यंत्राद्वारे  प्रतितास २५० किलो सुपारी पॉलीश करता येते. त्यासाठी १ एचपी ते ३ एचपी क्षमतेची मोटार वापरली जाते.  या यंत्राची किंमत ६० ते ८५ हजार इतकी आहे. 

कापणी यंत्र -  वेगवेगळ्या आकारात सुपारी कापण्यासाठी कतरीचा उपयोग केला जातो.   हे यंत्र हे स्वंयचलित असून त्याद्वारे प्रतितास  सुमारे १०० किलो सुपारी कापली जाते. हे सिंगल फेजवर हे यंत्र चाललते.  या  यंत्राची किंमत  ५५ ते ६० हजार इतकी आहे.

 


पॅकिंग मशीन - प्रक्रिया केल्यानंतर  सुपारी व्यवस्थित पॅकिग करणे आवश्यक असते. यामुळे विक्रीयोग्य आकर्षक आणि त्याचवेळी अधिक  काळ टिकण्यच्या दृष्टीने उत्तम पॅकिग गरजेचे असते. स्वयंचलित यंत्राने प्रति तास १५०० ते ४२०० पिशव्या पॅक केल्या जातात.  प्रत्येक पिशवी १० ते २५० ग्रॅम या मार्यादेची असून शकते. याची किंमत ९० हजार ते १.५० लाख रुपये इतकी आहे.

English Summary: Learn the cost of equipment required for betel nut processing Published on: 29 August 2020, 05:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters