1. यांत्रिकीकरण

आयएमडीने लॉन्च केले मौसम एप ; जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) ने आपले एक मोबाईल एप लॉन्च केले आहे. या एपचे नाव हे मौसम ठेवण्यात आले आहे असून याच्या मदतीने देशातील ४५० शहरांच्या हवामान अपडेट ऑन टाईम कळणार आहे. हवामानाच्या माहितीसह इशाराही या एपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हवामानाची माहिती देणारा हा पहिला सरकारी एप आहे.

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली : हवामान विज्ञान विभाग (आयएमडी) ने आपले एक मोबाईल एप लॉन्च केले आहे. या एपचे नाव हे मौसम ठेवण्यात आले आहे असून याच्या मदतीने देशातील ४५० शहरांच्या हवामान अपडेट ऑन टाईम कळणार आहे. हवामानाच्या माहितीसह इशाराही या एपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हवामानाची माहिती देणारा हा पहिला सरकारी एप आहे.  याआधी असलेले हवामानावर आधरित एप जुन्या आकड्यावरून आणि पावसाच्या निरीक्षणारुन माहिती देत होते. मौसम एपचे लक्ष्य हे शहरी लोक आहेत.

हवामानाचा अंदाज आणि पुर्व अंदाजासह रडार आणि उपग्रहाहून घेण्यात आलेले फोटोही दाखविण्यात येतील, हे फोटो आधी फक्त आयएमडीच्या वेबसाईटवर दाखवले जात होते. इकोनॉमिक्स टाईम्सला एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे.  पुढील वर्षी हे एप हायपरलोकल मॅप्स आणि क्षेत्रिय भाषांच्या पर्यायासह आपला विस्तार करेल. पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही सुविधा वाढविण्यात येतील. शेतकऱ्यांना जीपीएसच्या आधारे प्रत्ये तीन तासात अपडेट मिळतील तेपण त्यांच्या भाषेत याची माहिती मिळवू शकतील. ग्रामीण क्षेत्राचा नकाशा बनवणे कठिण असल्याने आम्ही शहरांना या एपमध्ये जोडण्यात आले. मागील वर्षापासून या देशी एपवर काम चालू होते.

परंतु कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणामुळे या एपला लॉन्च करण्यास उशिर झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान आयएमडीने सरकारच्या उमंग एपमध्ये राज्य आणि केंद्र सेवांच्या बिल भरणाचा पर्याय देण्यात आला आहे. पण उमंगमध्ये अपडेटचा अभाव होता. आता ती कमी मौसम पुर्ण करणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या १४ व्या स्थापना दिवशी बोलताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी जलवाायू पूर्वनुमानासाठी पृथ्वी प्रणाली मॉडल उपयोग करत मागील दोन वर्षांमध्ये सरकार रेन गेजिंग आणि क्लाउड सीडिंगवर शोध करण्याविषयी सांगितले. या प्रयोगांमुळे आयएमडीला मॉन्सूनला चांगल्या प्रकारे आकलन करण्यास मदत होईल.

English Summary: IMD launches weather app, know its benefits Published on: 29 July 2020, 01:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters