1. यांत्रिकीकरण

आला होंडा इंडियाचा शक्तिशाली पावर टिलर, शेतीमधील यांत्रिकीकरणाला मिळेल बळ

भारतातील आघाडीची कंपनी होंडा इंडिया पावर प्रॉडक्टस लिमिटेड ने अत्यंत छोटा आणि वापरण्यास सुलभ असा पावर टिलर एफक्यू 650 बाजारात दाखल केला असून ग्राहकांच्या बऱ्याच गरजा भागविण्याची ताकत या पावर टिलर मध्ये आहे. शेतकऱ्यांना नेहमीच एक आटोपशीर आकाराचा, शक्तिशाली व किफायतशीर अशा किमतीतला पावर टिलर ची गरज भासते. असे आटोपशीर पावर टिलर हे फळबागा, झाडांच्या नर्सरी, कपाशी, नगदी पिके इत्यादींसाठी लागणारी जमिनीची मशागत, खुरपणी नांगरणी, पिकांमधील तण काढण्यासाठी अशा आटोपशीर आकाराचा पॉवर टिलरची शेतकऱ्यांना अपेक्षा असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा पावर टिलर चे सतत मागणी असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
honda power tiller

honda power tiller

 भारतातील आघाडीची कंपनी होंडा इंडिया पावर प्रॉडक्टस लिमिटेड ने अत्यंत छोटा आणि वापरण्यास सुलभ असा पावर टिलर एफक्यू 650 बाजारात दाखल केला असून ग्राहकांच्या बऱ्याच गरजा भागविण्याची ताकत या पावर टिलर मध्ये आहे. शेतकऱ्यांना नेहमीच  एक आटोपशीर आकाराचा, शक्तिशाली व किफायतशीर अशा किमतीतला पावर टिलर ची गरज भासते. असे आटोपशीर पावर टिलर हे फळबागा, झाडांच्या नर्सरी, कपाशी, नगदी पिके इत्यादींसाठी  लागणारी जमिनीची मशागत, खुरपणी नांगरणी, पिकांमधील तण काढण्यासाठी अशा आटोपशीर आकाराचा पॉवर टिलरची शेतकऱ्यांना अपेक्षा असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा पावर टिलर चे सतत मागणी असते.

होंडा इंडिया पावर प्रोडक्स लिमिटेडने लॉन्च केलेले एफकयू 650 या पॉवर टिलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आटोपशीर टिलरची दीर्घकालीन व प्राथमिक गरज पूर्ण होणार आहे. कारण शेतकरी हे बरेच दिवसांपासून दैनंदिन कृषी गरजांसाठी एक पावरफुल आणि भक्कम आणि किफायतशीर अशा पावर टिलर च्या प्रतीक्षेत होते.

 होंडा एफक्यू पावर टिलर चे वैशिष्ट्ये

  • या पावर टिलर ला जीपी 200 एच इंजिनची जोड असून त्या माध्यमातून 5.5 हॉर्स पावर की शक्ती प्राप्त होते. त्यामुळे हे पावर टिलर सर्वोत्तम कामगिरी देतो.
  • हे पावर टिलर 12.4 एन एम @2500 आरपीएम कमाल टॉर्क कामगिरी देते. तसेच त्याला तीनशे एम एम टाईन डाया व 900 एम एम ची नांगरणी रुंदी आहे. त्यामुळे हे पावर टिलर शेतातील अनेक प्रकारासाठी सक्षम आहे.
  • या पावर टिलर ची इंधन कार्यक्षमता उच्च असून त्याचे वजन केवळ  65.2 किलो आहे. हे वजन पावर डीलर क्षेत्रातील सर्वात कमी वजन असून यामुळे शेतकऱ्याच्या पावर टिलर च्या बाबतीत असलेल्या टिकाऊ, आटोपशीर, पावरफूल आणि किफायतशीर सेवा या सगळ्या मागण्या पूर्ण होतात.
  • एफक्यू 650 या पावर टिलर ची रचना सुरक्षितता धोरण व ग्राहक सनी ही वैशिष्ट्ये ध्यानात ठेवून केली गेली आहे. हे पावर टिलर चे नियंत्रण हे चालवणारच्या हाती असून त्याला बर्ड केज  संरक्षण आहे.
  • या पावर टिलरला सुरक्षित वापरासाठी सब फेंडर असून गिअर शिफ्टिंग गेट सुद्धा आहे. त्याच्या मदतीने वेग कमी-अधिक करण्यासाठी गियर अगदी आरामात बदलता येतात.
  • यामध्ये वाहतूक चाक, पुढील स्टड आणि हॅण्डल बार याला कमी-अधिक उंची करण्याची सोय असल्यामुळे हे पावर टिलर स्त्री किंवा पुरुष शेतकऱ्यांना  वापरता येतो. नवीन माणूसही अगदी सहजपणे हे पावर टिलर वापरू शकतो.
  • एफक्यू 650 मध्ये अतिरिक्त टेलर सुसंगत जोडणीची मुभा असून त्यात येलो रिजरचा समावेश आहे. त्याद्वारे जलवाहिन्या बनविण्यासाठी त्याचा वापर होतो आणि जमिनीखालील पिकांसाठी वाफे काढत सक्षमपणे खुरपणी करणेही शक्य होते.

 

  • याशिवाय या पावर टिलर च्या मदतीने ब्ल्यु स्पायरल च्या माध्यमातून कार्यक्षमपणे उंच गवत कापत येते. तसेच या पावर टिलर मध्ये नियमित तन खुरपणी  कामासाठी एक आदर्शवत अशी फ्लॉवर टाईन जोडणी आहे.

 

होंडा चे उत्पादने त्यातच पावर टिलर सारखे उत्पादन भारतीय शेतकऱ्यांमध्ये कित्येक वर्षांपासून लोकप्रिय आहेत. पावर टिलर मधील हे नवीन मॉडेल शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण वाढण्यासाठी मदत करेल. या यंत्राच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शेतातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल. होंडा एफक्यू 650एक सर्वात शक्तिशाली, आटोपशीर व सोयीस्कर असल्याने अगदी  नवीन शेतकरीही याला चालू शकतो.

English Summary: honda power tiller Published on: 04 July 2021, 01:03 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters