सध्या देशात कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. यात अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. पण याच काळात शेती फुलत होती. कोरोनामुळे देशात पुर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते, यामुळे सर्व अर्थचक्र ठप्प झाले होते. पण शेती संबंधित व्यावसायांना आणि इतर कामांना शासनाने मोकळी दिली होती. यादरम्यान ट्रॅक्टर व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. गेल्या मागील चार वर्षातील मरगळ याच काळात दूर झाली आहे. कारण ट्रॅक्टर खरेदीसाठी ग्राहक वेटिंगवर राहत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. हे वर्ष इतर क्षेत्रासाठी चांगले गेले नाही,पण ट्रॅक्टर उद्योगात मोठी तेजी आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या आर्थिक वर्षात जवळपास १९६९ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा एप्रिलपासून ३० सप्टेंबरपर्यंतच ११४७ ट्रॅक्टर विकून झाले आहेत. वर्षभराची विक्री ही सहा महिन्यात झाली आहे. दरम्यान कोरोना काळात ट्रॅक्टर निर्मिती उद्योगाला थोडी झळ पोहचली आहे. कारण ट्रॅक्टरला लागणाऱ्या पार्टचा पुरवठा वेळेवर झाला नाही. कंपन्यांमध्ये उत्पादनही ठप्प होते. याचा परिणाम आता ट्रॅक्टर पुरविण्यावर होत आहे. यामुळे ग्राहकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांसाठी खासगी बँक एसडीएफसीने एक ऑफर आणली आहे. या ऑफरच्या अंतर्गत अर्ध-शहरी, ग्रामीण भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांना मोटार सायकल व सोन्याच्या कर्जावर तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्जावर मोठी सूट दिली जात आहे. ही ऑफर ९ ऑक्टोबरपासून अंमलात आली आहे. सरकारच्या कॉमन सर्विस सेंटर नेटवर्कशी करार करत एचडीएफसी बँकेने दरवर्षीप्रमाणेच ‘फेस्टिव्हल ब्लास्ट ऑफर’ सुरू केलेली आहे. यावर्षी भारत सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर-सीएससी) नेटवर्कशी करार केला आहे.
जेणेकरून बँकेला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवेश मिळेल आणि ग्रामीण भागातील लोकही याचा मोठा लाभ घेऊ शकतील. ही ऑफर अर्ध-शहरी भागासाठी देखील आहे. ट्रॅक्टर कर्ज, कार कर्ज, मोटारसायकल कर्जावर विशेष सूट एचडीएफसी बँकेने आपल्या योजनेनुसार मोठी सूट दिली आहे. जेणेकरुन लोक कार, ट्रॅक्टर, मोटरसायकल कर्ज घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करु शकतील असे त्यांनी संगितले आहे.
यामध्ये ग्रामीण भागातील १.२ लाख नोंदणीकृत व्यावसायिकांनादेखील सीएससी अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर बँकेशी संबंधित ३००० हून अधिक स्थानिक व्यावसायिकही बँकेच्या वतीने ही सुविधा पुरवतील. या अंतर्गत ५ – १५ % पर्यंत सूट देण्यात येईल.
तुम्हाला कसा फायदा होईल?
एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेण्यास इच्छुकांना स्थानिक सीएससीपर्यंत पोहोचून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत प्रक्रिया शुल्कात सूट असेल तर ईएमआयवरही दिलासा मिळेल. इतकेच नाही तर वेळेपूर्वी कर्ज भरणाऱ्यांनाही सूट मिळणार आहे. ग्रामीण भागात विशेष भर एचडीएफसी बँक ग्रामीण भागातील लोकांना या योजनेद्वारे शून्य प्रक्रिया शुल्कावर कर्ज देईल. इतकेच नाही तर १९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर, पहिल्या सहा महिन्यांपर्यंत ईएमआयवर २५% सूट मिळेल. किसान गोल्ड लोन योजनेअंतर्गत प्रक्रिया शुल्क निम्मे करण्यात आले आहे. ही ऑफर ३० सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकेच्या चालू असणाऱ्या ऑफरचे २.० वर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे.
Share your comments