1. यांत्रिकीकरण

ऐकलं का ! राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरणावर देणार अनुदान; ऑनलाईन करा अर्ज

भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील जवळ-जवळ ७० टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्याच्या काळामध्ये शेती व्यवसायात आधुनिकीकरणाचे व यांत्रिकीकरणाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन व पर्यायी शेतीची कामे यंत्राच्या साह्याने होत आहे.

KJ Staff
KJ Staff


भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील जवळ-जवळ ७० टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्याच्या काळामध्ये शेती व्यवसायात आधुनिकीकरणाचे व यांत्रिकीकरणाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन व पर्यायी शेतीची कामे यंत्राच्या साह्याने होत आहे. यंत्रामुळे कामे केली जात असल्याने कमी मजुरांच्या साहाय्याने व अल्पकाळात जास्त प्रकारची कामे शेतकरी करू लागले आहेत.  सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध योजना अंमलात आणून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे सहकार्य करत आहेत.  त्यातीलच एक योजना म्हणजे शेतीकामासाठी लागणाऱ्या यंत्रांवर देण्यात येणारी अनुदान योजना. त्याबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

हेही वाचा : कृषी यंत्रासाठी केंद्र सरकार देतयं अनुदान अन् इतर विशेष सुविधा; त्वरित करा अर्ज

शासनाने सन २०२०-२१ या वर्षाच्या कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना सुरू केली आहे.  शेतामध्ये लागणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या यंत्रांसाठी ही योजना लागू आहे.  जसे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रोलिक पलटी नांगर, ऊस पाचट, कडबा कुट्टी यंत्र, पावर टिलर, विडर मशीन, फवारणी यंत्र,  ट्रॅक्टर व ट्रॅक्‍टरचलित विविध प्रकारच्या अवजारांसाठी ही योजना लागू आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना खरेदी करायचे असतील तर याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.  त्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यांची यादी खालीलप्रमाणे.

अ - शेताचा सातबारा उतारा व आठ अ चा उतारा

ब - संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड( ज्याच्या नावे सातबारा असेल त्याचे कार्ड)

क - बँकेचे पासबुक

ड - ट्रॅक्टर अनुदान घ्यायचे असेल तर ट्रॅक्टरचे आरसी बुक

इ - आवश्यक असल्यास कास्ट सर्टिफिकेट

 


शेतकरी बांधवांनी वरीलप्रकारे कागदांची पूर्तता केल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरावा व अर्ज भरल्यानंतर मिळालेली पावती सांभाळून ठेवावी. सन २०२० ते २१ करिता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर प्रकारचे अवजारे घ्यायचे आहेत, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. दरम्यान केंद्रावर जाताना आधार कार्ड,  बँक पासबुक इत्यादीवरील नमूद केलेली कागदपत्रे जरूर सोबत न्यावीत.

 खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतो.

https://mahadbtmahait.gov.in/farmer/log

 किंवा

https://mahadbtmahait.gov.in त्यामुळे शेतकरी बंधुंनी या योजनेचा फायदा जास्त प्रमाणात घ्यावा.

English Summary: Have you heard State Government to provide subsidy on agricultural mechanization; Apply online Published on: 09 October 2020, 03:00 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters