लसणाच्या काढणीसाठी उपयुक्त हार्वेस्टर

26 March 2021 02:11 PM By: KJ Maharashtra
हार्वेस्टर

हार्वेस्टर

लसूण ही आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मसाल्यांमध्ये लसुनची स्वतःची एक चव असून- लसुनशिवाय मसाल्याला महत्त्व राहत नाही.

भारताच्या अनेक भागांमध्ये लसणाची शेती केली जाते. आता सध्या लसनाचे उत्पन्न घेणारे शेतकरी लसणाची कापणी करतात. लसणाची कापणी करताना हार्वेस्टरचा उपयोग केला पाहिजे जेणे करून कमी खर्चात आपले काम पूर्ण होईल. लसणाच्या शेतीसाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेशातील वातावरण खूप उपयुक्त आहे.  महाराष्ट्रातही लसणाचे पीक घेतले जाते. पण बऱ्याच वेळेस लसूण हा नाममात्र किंवा आपल्या वापरा पुरता लावला जात असतो. लसणाची काढणी एप्रिल व मे महिन्यात केली जाते.

 

उत्तर प्रदेशात त्याची काढणी एप्रिल आणि मे महिन्यातच होत असते. दरम्यान मजूर आणि अवजारांची कमतरता असल्याने लसणाची शेती करणे कमी झाले आहे.  लसणाची काढणे करण्यासाठी अनेक तंत्र आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्यांची माहिती नसल्याने या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. लसुन काढणीसाठी जमीन खोदावी लागते किंवा त्याला दोन्ही हाताने खेचून काढावे लागते. यामध्ये खूप वेळ वाया जातो. यासाठी प्रति हेक्‍टरी 30 ते 35 मजुरांची गरज असते. काही जागेवर कल्टीवेटर लावून लसुन काढला जातो.

यामुळे पिकाचे नुकसान होत असते. दरम्यान ट्रॅक्टर 40 चा लसुन काढण्यासाठी वापर केला तर मजुरांची संख्याही कमी होते आणि पिकाचे नुकसान होत नाही. या मशीन मध्ये 1.5 मीटर अरुंड ब्लेड असते त्याच्या साह्याने जमीन खोदली जाते. लसुन उपट आल्यानंतर ते जायच्या मध्ये टाकले जाते. मशीन सुरू असल्याने जाळी मध्येच माती आणि लसूण वेगळे होत असतात.

 

त्यानंतर जाळीच्या मागील पट्टीत लसुन जात असतो. या मशीनचे कार्यक्षमता पंचवीस पॉईंट तीस हेक्‍टर प्रति घंटा आहे. या मशीनचा काढण्यासाठी खर्च हा तीन ते चार हजार रुपये प्रति हेक्‍टरी येत असतो.  कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये हे मशीन उत्तम रित्या चालत असते. यामुळे लसुन हार्वेस्टर चा उपयोग शेतकऱ्यांनी करावा.

harvesting garlic harvesting machine लसूण हार्वेस्टर
English Summary: Harvester useful for garlic harvesting

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.