1. यांत्रिकीकरण

शेतकऱ्यांनो खूशखबर ! ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर वाचवणार तुमचा पैसा अन् वेळ

शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत असतो, नांगरणी आणि इतरच्या कामांसाठी ट्रक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनांचे दर गगनाला भिडत असल्याने आपल्या खिशाला कात्री बसत असते.

KJ Staff
KJ Staff


शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत असतो, नांगरणी आणि इतरच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु  दिवसेंदिवस इंधनांचे दर गगनाला भिडत असल्याने  आपल्या खिशाला कात्री बसत असते.  ट्रक्टर म्हणा किंवा इतर वाहने त्यांच्या इंधनावरती मोठा पैसा खर्च करावा लागतो.   परंतु शेतीच्या कामांसाठी आपण ट्रॅक्टर नाही वापरला तर आपली कामे पडून राहतील.  आता बाजारात असे ट्रॅक्टर येणार आहे जे आपला पैसा आणि वेळही वाचवणार आहे.  याआधी ईलेक्ट्रिक बस, कारविषयी ऐकलं किंवा वाचलं असेल आता बाजारात ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार आहे. या ट्रॅक्टरमुळे आपला इंधनावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत.

काय फरक आहे डिझेल - नॉर्मल ट्रॅक्टर आणि  ई-ट्रॅक्टरमध्ये

या दोन्ही ट्रॅक्टरमधील मुख्य फरक म्हणजे त्यांची ऑपरेटिंग किंमत. ई-ट्रॅक्टरचा ऑपरेटिंग खर्च एका तासामध्ये सुमारे २५ ते  ३०  रुपये असेल.  तर सामान्य ट्रॅक्टर चालविण्यास दर तासाला सुमारे दीडशे रुपये खर्च येतो.  ई- ट्रॅक्टर प्रति तासाला शेतकऱ्यांचे सुमारे १२० रुपयांची बचत करेल.  जर प्रत्येक तासाला तुमचे १२० रुपये वाचत असतील तर तुमचा मुबलक पैसा वाचणार आहे.  हे ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर शुन्य उत्सर्जन करेल अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे, यामुळे हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे.  ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरमधील बॅटरी आपण बदलू शकतो, आणि त्याला परत चार्जही करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या किंमतीच्या तुलनेत स्वस्त आहे.

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उत्पादक

सेलेस्ट्रियल ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ दुराराजन या ट्रॅक्टरविषयी बोलताना म्हणाले की, हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा ऑपरेटिग खर्च वाचवते.  एका तासाला लागणारा १५० रुपयांचा खर्च कमी होऊन हा फक्त २५ ते ३० रुपये लागणार आहे.  शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा ई- ट्रॅक्टर लवकरच  भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल.  भारतीय शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर घेणे हे फार आव्हानात्मक गोष्ट असते. कारण ट्रॅक्टर घेण्यासाठी लागणार खर्च आणि ऑपरेटिंगसाठी लागणारं मनुष्यबळ आदी गोष्टी ह्या आव्हानात्मक असतात.  पण शेतकरी बांधव आता ट्रॅक्टर खरेदी करु शकतील कारण ई-ट्रॅक्टरची किंमत ही इतर ट्रॅक्टरपेक्षा कमी असल्याचेही दुराजन म्हणाले.  नियमित ट्रॅक्टरची किंमत ही साधारण ६ लाख रुपये आहे. परंतु या ई- ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये असणार आहे. शिवाय तासाचा ऑपरेटिंग खर्च हा फक्त २५ ते ३० रुपये येणार आहे.

Special features of e-tractor ई-ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • ई-ट्रॅक्टर्समुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे, कारण ई-ट्रॅक्टरचे इंजिन ३०० भागात येत नाही. साधरण ट्रॅक्टरचे इंजिन ३०० पार्टमध्ये येत असते.
  • आपण या ट्रॅक्टरची बॅटरी बदलू शकतो, किंवा त्याला परत चार्ज करु शकतो.
  • ई-ट्रॅक्टरची पावर ही ६ एचपी आहे, पण ही पावर साधरण ट्रॅक्टरच्या २१ एचपीच्या बरोबरीची आहे.
  • एकदा चार्जिंग केल्यानंतर ई-ट्रॅक्टर ७५ किलोमीटर धावू शकते.
  • इलेक्ट्रिक ट्रॅक्टर २० किमी प्रतितास वेगाने धावू शकते.
  • औद्योगिक ट्रॅक्टरमध्ये निवासी वातावरणात बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सहा तासांपर्यंतचा कालावधी लागतो जेथे औद्योगिक उर्जा सॉकेटमधील बॅटरी २ तासात वेगवान चार्ज होऊ शकते.

English Summary: Good News for Farmers! Electric Tractors to Reduce Cost of Farming, Save Money and Time Published on: 25 April 2020, 11:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters