लसणाच्या काढणीसाठी वापरा हार्वेस्टर; वाचेल आपला अमुल्य वेळ

Wednesday, 13 May 2020 01:12 PM


लसूण हे आपल्या स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. मसाल्यांमध्ये लसूणची आपली एक चव असून लसूणशिवाय मसाल्यांला महत्त्व राहत नाही. भारतातील अनेक भागात मसाले पदार्थांची शेती करतात,त्यात लसूणचे पीक महत्त्वाचे आहे. आता सध्या लसणाचे उत्पन्न घेणारे शेतकरी लसणाची कापणी करत आहेत. लसणाची कापणी करताना हार्वेस्टरचा उपयोग केला पाहिजे जेणेकरून कमी खर्चात आपले काम पुर्ण होईल.

लसणाच्या शेतीसाठी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि मध्यप्रदेशातील वातावरण खूप उपयुक्त आहे. आपल्या राज्यातही लसणाचे पीक घेतले जाते. पण बऱ्याच वेळेस लसूण हा नाममात्र   किंवा आपल्या वापरापुरता लावला जात असतो. लसणाची कापणी किंवा काढणी एप्रिल व मे महिन्यात केली जाते. उत्तर प्रदेशात याची काढणी एप्रिल आणि मे महिन्यातच होत असते. दरम्यान मजूर आणि अवजारांची कमतरता असल्याने लसणाची शेती करणे कमी झाले आहे. लसणाची काढणी करण्यासाठी अनेक तंत्र आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्यांची माहिती नसल्याने या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत. लसूण काढणीसाठी जमीन खोदावी लागते. किंवा त्याला दोन्ही हातांनी खेचून काढावे लागत असते यात खूप वेळ जात असतो. यासाठी प्रति हेक्टर ३० ते ३५ मजदूरांची गरज असते. काही जागेवर कल्टीव्हेटर लावून लसूण काढला जातो, यामुळे पीकाचे नुकसान होत असते. दरम्यान ट्रॅक्टर ४० चा लसूण काढणीसाठी वापर केला तर मजुरांची संख्याही कमी होते आणि पिकाचे नुकसानही होत नाही. या मशीनमध्ये १.५ मीटर रुंद ब्लेड असते. त्याच्या साहाय्याने जमीन खोदली जाते.

लसूण उपटल्यानंतर ते जाळीच्या मध्ये टाकले जाते. मशीन सुरु असल्याने जाळीमध्येच माती आणि लसूण वेगळे होत असतात. त्यानंतर जाळीच्या मागील पट्टीत लसूण जात असतो.  या मशीनची कार्य क्षमता २५ ते पॉईंट ३० हेक्टर प्रति घंटा आहे. या मशीनचा काढणीसाठीचा खर्च हा ३ ते ४ हजार रुपये प्रति हेक्टर येत असतो. कोणत्याही मातीमध्ये ही मशीन उत्तमरित्या चालत असते. यामुळे लसूण हार्वेस्टरचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा. यामुळे कमी पैशात लसूणची काढणी होते.

garlic harvester garlic harvesting machine garlic planting machine लसूण काढणी लसणाची शेती लसूण काढणी मशीन हार्वेस्टर लसूण हार्वेस्टर
English Summary: garlic harvester will save our time

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.