शेतीच्या कामासाठी आजकाल ट्रॅक्टरचा वापर खूपच वाढला आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेताचे नांगरणी,रोटावेटर,जमीन सपाटीकरण तसेच पेरणी सारखे बरीचशी कामे सुलभ रीत्या, दर्जेदार पणे व कमी वेळेत होऊ शकतात.
शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रॅक्टर चे स्थान फार महत्त्वाचे आहे. ट्रॅक्टर विकत घेताना निरनिराळ्या कंपन्यांच्या जाहिरातींना बळी न पडता अभ्यासांती अनुभव जमेला धरावा आणि गुणवत्ता दर्जेदारपणा आधी आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर ची निवड करावी. तुम्ही घेतलेला ट्रॅक्टर सुलभतेने चालावा व त्याची कार्यक्षमता कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे टिकून राहायलाहवी यासाठी ट्रॅक्टर योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते. या लेखात आपण ट्रॅक्टर ची निगा कशी ठेवावी याबद्दल माहिती पाहणार आहोत
अशा पद्धतीने घ्यावी ट्रॅक्टर ची काळजी
ट्रॅक्टर चे काम झाल्यानंतर ऊन आणि पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवार्याला उभा करावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल तसेच काडी-कचरा काढून व्यवस्थित स्वच्छ करावा. ट्रॅक्टर हा नेहमी एक हाती असावा. ड्रायव्हर सारखे सारखे बदलू नयेत तसेच महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे इंजिन टाकीतले तेल पुरेसे आहे की नाही ते पाहावे.
पंपा मधील वंगण / तेल डीप स्टिक च्या सहाय्याने तपासावे. रेडिएटर मधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे.एअर क्लीनर स्वच्छ करावा. ट्रान्समिशन ऑइल डीपस्टिक च्या साह्याने तपासावे. टायर मधला हवेचा दाब योग्य आहे की नाही याची खात्री करावी. ज्या ठिकाणी ग्रीसची आवश्यकता असते असे भाग तपासावेत. महत्वाचे नॉट आणि बोल्ट तपासावे तसेच बॅटरी मधल्या पाण्याची पातळी योग्य आहे की नाही हे तपासावे. ट्रॅक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावे.क्लच पॅडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्यूट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफ च्या बाजूला फिरवावे.. गरज असेल तरच पार्किंग ब्रेक लावावेत. चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला ट्रॅक्टर थांबऊन त्याचे कारण शोधावे. ट्रॅक्टरचा इंजिन मधून सतत काळा धूर निघत असेल तर त्या वरचा भार कमी करावा. ट्रॅक्टर गतीमध्ये असताना त्वरित गियर बदलू नये. ट्रॅक्टर मागे घेताना अवजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी.ड्राबर पट्टी अगर अवजारांवरउभे राहू नये. क्लच नेहमी हळुवार सोडावा. रोडवर चालताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहमी ट्रॅक्टर गिअर मध्ये असावा. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये. मॅन्युअल प्रमाणे ट्रॅक्टरचा सर्विसिंग करून घ्याव्यात.
कामाच्या तासावरून ट्रॅक्टरचे व्यवस्थापन
- आठ ते दहा तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी-
- इंजिन मधील व इयर क्लीनर मधील तेलाची पातळी तपासावे.
- रेडिएटर व बॅटरी मधील पाण्याची पातळी तपासावे.
- ट्रॅक्टर चे काम धुळीमध्ये असेल तर इयर क्लीनर मधील तेल बदलावे.
- डिझेल लिकेज आहे का ते पहावे.
- पन्नास ते साठ तासांच्या कामानंतर करावयाच्या गोष्टी-
- फॅन बेल्ट तान योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.
- गिअर बॉक्स मधील तेलाची पातळी तपासावी.
- ट्रॅक्टरच्या चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे किंवा नाही याची खात्री करावी.
- बॅटरी व मोटार यांचे सर्व कनेक्शन घट्ट बसवावी.
- इंधन फिल्टर मध्ये साचलेले पाणी बाहेर काढावे.
ट्रॅक्टर ची दुरुस्ती
- ट्रॅक्टरचा कोणता भाग कधी बदलायचा यासाठी काही ठोस असा नियम नाही. सर्वसामान्य ट्रॅक्टरच्या कार्याचा विचार करता एकूण चार हजार तास काम केल्यानंतर इंजिनच्या कॉम्प्रेसर मध्येघसारा येतो व पूर्ण शक्ती तयार करण्यामध्ये इंजिन अपयशी ठरते. तसेच सिलेंडर लाइनर व पिस्टन रिंग बदलावे लागतात.
- जेव्हाट्रॅक्टर च्या कामाचे 8000 तास पूर्ण होतात तेव्हा क्रॅकशाफ्टव कॅमशाफ्टतपासणी करावी.त्यावेळी कमी मापाचे बेरिंग वापरावे लागते. शक्यतो दुसऱ्या ओव्हरहोलिंग च्या वेळेस पिस्टन व सिलेंडर लाईनरबदलावे.
- इंजिन ओहर हॉल करताना पिस्टनच्याडोक्यावरील वरील खाचामधील तसेच वोल्व्हदांडी वरचा कार्बन व काळी चिकट तेलकट घाण स्वच्छ करावीव सर्व भाग केरोसीन मध्ये स्वच्छ धुऊन काढावे.
- इंजिन हेड जोडताना नवीन गॅस केटचा वापर करावा. सिलेंडर गॅसकेट मध्ये गळती राहिल्यास तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो किंवा सिलेंडर मध्ये पाणी घुसण्याची किंवा दोन्ही शक्यता वाढते.
Share your comments