भातशेती लागवड शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस बिकट समस्या होत चालली आहे. शेतकरी (farmers) भात शेतीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे यावर मात करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली जावी असे धोरण कृषी विभागाने (Department of Agriculture) स्वीकारले आहे.
पावसाचा खंड जरी पडला तरी कमी पाण्यावर शेतकरी रोपवाटिका तयार करू शकतो. याप्रमाणे तयार केलेली रोपवाटिका बाजारात उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांच्या (मिहद्रा, कुबोटा, इ.) भात लावणी यंत्राद्वारे दोन मजुरांच्या सहाय्याने करता येते. तसेच शासन या यंत्रावर शेतकऱ्यांना अनुदानही देत आहे.
एका दिवसात ४ रांगांच्या यंत्राद्वारे २ ते ३ हेक्टर क्षेत्रावर लावणी होवू शकते. त्यासाठी एकरी १ ते १.५ लिटर पेट्रोल लागते. भात लावणी यंत्र एका हंगामात ४० हेक्टपर्यंत लावणीचे काम करु शकते. यासाठी पाच हजार रुपयेपर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च येतो.
महत्वाच्या बातम्या
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर
पारंपरिक पद्धतीने भात लावणी करावयाची झाल्यास हेक्टरी ३० मजूर लागतात. त्या तुलनेत यंत्राद्वारे केवळ २ मजुरांद्वारे भात लावणी होते. त्यामुळे मजुरी खर्चात ९० टक्के पर्यंत बचत होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होते.
यंत्रासाठी शासनाचे अनुदान
बाजारात ४ रांगांचे भात लावणी यंत्र अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण या योजनेतून त्यास ५० टक्के अनुदान मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर (https://mahadbtmahait.gov.in) अर्ज करावा, अर्ज केल्यानंतर तुमची लॉटरी पद्धतीने निवड होईल.
महत्वाच्या बातम्या
Today Horoscope: 'या' ५ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून 'टेस्टिंग रिपोर्ट' (Testing Report) उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे यंत्र खरेदी करावे. यंत्र खरेदी केल्यानंतर कृषी पर्यवेक्षकांमार्फत त्याची तपासणी करुन देय ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हास्तरावरून तत्काळ वितरित करण्यात येईल.
भातशेतीतील मजुरांची समस्या तसेच जास्तीचे कष्ट पाहून यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने (Mechanical methods) भात लागवड (Planting rice) करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. या यंत्राचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
येत्या कालावधीत वाढ करण्याचा संकल्प कृषी विभागाने केला असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण (Agricultural Mechanization) योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच यात सामील होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन देखील केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Rice farming: अरे व्वा; आता भात लागवड होणार आणखी सोप्पी, यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा
Eknath Shinde: चक्क एकनाथ शिंदेंनीच केला मोदींचा निर्णय रद्द; आवास योजनेला दिली स्थगिती
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात, केली मोठी घोषणा..
Share your comments