जर आपण शेती उत्पादनाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेती मशागत, आंतर मशागत, कापणी आणि मळणी यावर होतो. म्हणजेच 30 ते 40 टक्के लागणारा खर्च आपण यंत्राचा वापर केल्यास 15 ते 20 टक्क्यांपर्यंत आणू शकतो. उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.या लेखात आपण पूर्व मशागतीसाठी, पीक संरक्षण व आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या काही यंत्र बद्दल माहिती घेऊ.
रोटावेटर
रोटावेटर हे यंत्र ट्रॅक्टरचलित यंत्र असून यामध्ये जे किंवा एल आकाराचे 24 ते 26 लोखंडाचे पाते बसविलेले असतात. यंत्राची लांबी 120 ते दीडशे सेंटिमीटर असते. रोटाव्हेटरच्या वापरामुळे जमिनीची नांगरणी केल्यानंतर उठलेली ढेकूळ फोडण्यासाठीमुख्यत्वेकरून केला जातो. यासोबतच जमिनीवर पडलेली पाचट, काही पिकांच्या अवशेषांचे बारीक तुकडे करून जमिनीमध्ये मिसळले जाते. त्यामुळे जमिनीमध्ये कंपोस्ट खत तयार होते. एका तासात या अवजाराने एक ते दीड एकर क्षेत्राची मशागत होते.
तव्यांचा कुळव
नांगरणी नंतर तयार होणारी मोठी ढेकळे फोडून जमीन पेरणीयोग्य करण्यासाठी तव्यांचा कुळव याचा उपयोग होतो. ताव्यांचा व्यास 40 ते 60 सेंटिमीटर असून ते पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर लावलेले असतात.
ट्रॅक्टरचलित हवा दबाव आधारित टोकन यंत्र
या यंत्रामुळे पेरणी दरम्यान दोन ओळीतील अंतर, खोली व रोपातील आंतर अचूक पणे साधने शक्य होते. हे यंत्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे. 35 ते 45 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टर ला यंत्र जोडता येते. तसेच या यंत्राची कार्यक्षमता 0.5 ते 1.0 प्रति तास आहे. या यंत्राने ज्वारी, सोयाबीन, कापूस, तुर, भुईमूग, भेंडी इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.
रुंद वरंबा आणि सरी यंत्र
बियाण्याचे असमान वाटप,कुशल मजुरांची टंचाई, कमी कार्यक्षमता याचा विचार करून रुंद वरंबा व सरी यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र सोयाबीन, मका, हरभरा, भुईमूग, ज्वारी, बाजरी, उडीद, मुंग, वाटाणा, गहू इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तबकड्याअसून त्या सहज बदलता येतात. तसेच प्रत्येक ओळीसाठी फन असल्यामुळे बियाणे व खतांची योग्य प्रकारे पेरणी करता येते. दोन फ णातील अंतर आवश्यकतेनुसार नव्हते अठरा इंचापर्यंत ठेवता येते. या यंत्राच्या दोन्ही बाजूंना शर्यंत्र असल्यामुळे पेरणी करतांना सऱ्या पाडल्या जातात. या सरींमुळे कमी पाऊस पडल्यास जलसंवर्धन होते तर जास्त पाऊस पडल्या असतील तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. हे यंत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विकसित करण्यात आले आहे.
ट्रॅक्टरचलित कोळपे
ट्रॅक्टर चलीत कोळप्याला v आकाराचे पाते असून एकाच वेळी तीन ते पाच ओळीतील गवत काढले जाते. एका दिवसात सहा ते सात हेक्टर क्षेत्र पूर्ण करता येते. ट्रॅक्टर ने पेरणी केलेल्या क्षेत्रासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. तसेच पिकांच्या ओळी सरळ असल्यामुळे आंतरमशागत पूर्ण होऊन पिकांची हानी कमी होते.
या कोळप्यामुळे शेताचे कोळपणी लवकर पूर्ण होते. ताणाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते तसेच मातीचे रोपण आच्छादन होऊन आधार सुद्धा मिळतो. हे यंत्र हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केले आहे.
ब्रूम स्प्रेयर
ट्रॅक्टर वर पी टी ओ च्या सहाय्याने चालणारे यंत्र आहे.यात चारशे लिटर द्रावण क्षमतेची टाकी बसवलेली असते.यंत्राच्या साहाय्याने पाहिजे तेवढे द्रावण प्रति हेक्टरी फवारणी करू शकतो.यासाठी बूम स्प्रेयर वर कंट्रोल बसलेले असते. याच्या साह्याने पाहिजे त्या दाबाने व पाहिजे तेवढा द्रावणाची फवारणी करता येते. एचडीपी पंपाच्या साहाय्याने योग्य त्या दाबाने 50 ते 100 मायक्रोमीटर आकाराचे थेंब तयार होतात. फवारणी यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्रावर फवारणी करता येते.
Share your comments