1. यांत्रिकीकरण

मशागत क्षेत्रातील नवी पहाट

KJ Staff
KJ Staff


सध्यकाळातील भारतातील शेतकर्‍यांसमोरील मोठी समस्या म्हणजे शेतमजुरांची उपलब्धता नसणे. त्याचा परिणाम म्हणजे शेतकर्‍यांवरील शारीरिक व मानसिक ताण, शेतीच्या कामाला होणारा विलंब, त्यामुळे तोट्यात जाणारी शेती. या समस्येवर उपाय म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रातील पहिल्या थरातील यांत्रिकीकरण. त्यासाठी सहज परवडण्यासारखे, हाताळायला सोपे, तसेच शेतीची कामे वेळेवर पूर्ण करता येण्याजोगे, जास्त वजनदार नसलेले असे यंत्र शेतकर्‍याच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहे.

स्टिल इंडिया ही वन, कृषी आणि बाग-बगिच्यांसाठी लागणार्‍या औजारांची, आधुनिक यंत्रांची जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी आहे. लहानमोठ्या शेतकर्‍यांना परवडतील, वापरता येतील अशी कृषीपूरक यंत्रसामग्री या कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहे. भारतीय कृषी क्षेत्रासाठी ही नक्कीच नवसंजीवनी देणारी गोष्ट आहे. जमिनीची मशागत करण्यासाठी स्टिल इंडिया या कंपनीने अतिशय उपयुक्त असे उत्पादन तयार केले असून MH 610 व MH 710 टिलर्स मशागत क्षेत्रात एक नवी पहाट निर्माण केली आहे.

शेतातील माती चांगली नसेल तर मशागत करून माती तयार करण्यासाठी मशागत यंत्रे म्हणजेच टिलर्सची शेतकर्‍यांना मदतच होईल. विजेवर चालणार्‍या या मशागत यंत्रामध्ये जागतिक पातळीवरचे अत्याधुनिक युरो व्ही इंजिन असून त्यांची इंधनक्षमता उत्तम दर्जाची आहे. यामधील वेट एअर फिल्टर शुद्ध, धूळविरहित हवा कार्बोरेटरला पुरवते. एका वेळी भरपूर काम करण्याचा विस्तार व क्षमता असल्यामुळे आंतरमशागत करण्यासाठी, तणनाशक काढण्यासाठी तसेच लागवडीपूर्व जमीन तयार करण्यासाठी त्याची मदत होते. पुढील हँडल, चाके, उभा हँडल बार ही वैशिष्ट्ये असून हाताळायला हे यंत्र अतिशय सोपे आहे. थ्रोटल अ‍ॅक्टुएशन, गिअर बदलणारी यंत्रणा, प्रोटेक्टिंग हाऊसिंग कव्हर असलेले रोबुस्ट गिअर बॉक्स या सगळ्या यंत्रणेमुळे स्टिल टिलर्स फारच उपयुक्त आहे.

टिलर्स म्हणजेच मशागत यंत्राची दोन मॉडेल्स स्टिलने विकसित केली आहेत MH 610 व MH 710. याला अनुक्रमे 6 एचपी व 7 एचपी इंजिन्स असून देशभरातील सर्व वितरकांकडे ती उपलब्ध आहेत. तसेच ब्रश कटर्स, मिस्ट ब्लोअर्स, वीडर्स, वॉटर पंप्स, अर्थ आगर्स आणि स्प्रेयर्स उपलब्ध आहेत. या यंत्रांच्या सादरीकरणाच्या वेळी शेतकर्‍यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता. स्टिलने यावेळी ग्राहक स्पर्धा भरवली होती, टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल तसेच अन्य बक्षिसांची लयलूट होती.

स्टिलची भारतातील नियमित होणारी गुंतवणूक पाहता भारतीय बाजारपेठेत ही कंपनी विस्तारतेय, हे जाणवते. पुण्याजवळील चाकण येथे या कंपनीने तिच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली असून एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. शेती तोट्यात असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कमी उत्पादन क्षमता आणि स्टिल या कंपनीची उत्पादने यावरच काम करत आहेत. शेतकर्‍यांमध्ये नवचेतना निर्माण करण्यासाठी स्टिलची अत्याधुनिक यंत्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters