कम्बाईन हार्वेस्टर हे एक बहुउपयोगी व प्रगत असे कृषी उपकरण आहे. हे उपकरण गहू,तांदूळ,हरभरा, सोयाबीन,सूर्यफूल,मुगाची कापणी करण्यासाठी तसेच दाण्यांच्या सफाईसाठी कामात येते.या मशीनचा वापर केल्यामुळे लागणारे श्रम कमी होते तसेच वेळेतही बचत होते. हे मशीनच्या मदतीने शेतीच्या कामामध्ये सुलभता येऊन नफ्यात वाढ होते.
कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे प्रकार
कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे दोन प्रकार आहेत.
- स्वयंचलित कम्बाईनहार्वेस्टर
- ट्रॅक्टरचलित कम्बाईन हार्वेस्टर
स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर
याप्रकारच्या हार्वेस्टरमध्ये सर्व प्रकारची मशिनरी फिट असते. मशिनरी आपल्या शक्तीने इंजिन आणि इतर मशीनच्या भागांना संचालित करते. त्यामुळे ती काढणी, कापणी तसेच सफाईचे काम सुलभतेने होते.
ट्रॅक्टरचलित कम्बाईन हार्वेस्टर
याप्रकारच्या कंबाईन हार्वेस्टर मशीनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवले जाते. ह्या प्रकारच्या हार्वेस्टर हे ट्रॅक्टरला असलेल्या पी टी ओ मुळे चालते. ट्रॅक्टरला कम्बाईन जोडून पिकांची कापणी केली जाते.
शेतात कसे काम करते कम्बाईन हार्वेस्टर मशीन?
बाजारांमध्ये सध्या विविध कंपन्यांची हार्वेस्टर मशीन उपलब्ध आहेत. यात्रांमध्ये सगळ्यात पुढे २ ते ६ मीटर लांब कटर बार असतात. या मशीनच्या साहाय्याने पिकांची कापणी, बियाणे व धन्या ची सफाई केली जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीन रील हा उभ्या पिकाला मशीनमधील कापण्यासाठी उपयुक्त युनिट्स जवळ पोहोचवण्याचे काम करतो. त्यानंतर मशीनमध्ये असलेल्या कटर बारला जोडलेले चाकूमुळे पिकांची कापणी होते. त्यानंतर धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहोचवले जाते. येथे धान्याचे धरणे हे ड्रसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लिअरन्स रगडले जाऊन वेगळे केले जाते. त्यानंतर मशीनला असलेल्या गळणीमध्ये धान्य साफ केले जाते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनमध्ये एक स्टोन ट्रॅप युनिट बसवलेले असते. ज्याद्वारे धान्यामध्ये आलेले माती, दगड, बारीक खडे वेगळे केले जातात.
कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे फायदे
कम्बाईन हार्वेस्टर मशीन उपयोग केल्यामुळे मजुरांची समस्या दूर होते तसेच कमी वेळेत जास्त काम केले जाऊ शकते. या मशीनचा एक वेळ वापरामुळे पिकांची कापणी, काढणी आणि धन्याची स्वच्छता केली जाते. हे काम एकदम कमी खर्चात आणि कमी वेळेत पूर्ण होत असते. कम्बाईन हार्वेस्टर मशीनने पिकांची कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच राहतात. कालांतराने ते अवशेष कुजल्याने त्यांच्या खतात रूपांतर होते. कम्बाईन हार्वेस्टर यंत्राने कापणी केलेल्या धन्याचे उपयोग बीज उत्पादनामध्ये सुद्धा होतो. नामांकित कंपनीच्या हार्वेस्टर एका तासात ४ते ५ एकर क्षेत्राची कापणी करतात.
हेही वाचा : लागवडीपासून ते काढणीपर्यंतची कृषी यंत्रे; सोपं होईल महिलांचं काम
कम्बाईन हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान
वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी कंबाईन हार्वेस्टर मशीनवर अनुदान उपलब्ध केले जाते. अनुदानाची रक्कम ही वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळी आहे. छोटे शेतकरी महिला शेतकऱ्यांना ५० टक्के व मोठ्या शेतकऱ्यांना ४० टक्केपर्यंत सबसिडी उपलब्ध केली जाते.
कम्बाईन हार्वेस्टर मशीनची किंमत
शेतीमध्ये कृषी उपकरणांचा वापर हा सातत्याने वाढत आहे. आता विचार केला तर देशामध्ये कमीत-कमी २० पेक्षा जास्त कंपनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनचे उत्पादन करतात. कम्बाईन हार्वेस्टर मशीनच्या वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन नुसार १० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत बाजारात कंबाइन हार्वेस्टरची किंमत आहे.
मिनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनची किंमत
मोठ्या कंपन्या मिनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनही तयार करतात. मिनी कम्बाईन हार्वेस्टर मशीनची किंमत ५ लाख रुपयांपासून सुरू होते.
Share your comments