जुलै महिन्यात भाताची पेरणी केली जाते. यासाठी जमीन समतल बनवावी लागते, समतल केल्यामुळे जमीन सुपीक बनत असते. वेगवेगळ्या साधनांद्वारे शेतकरी शेत जमीन समतळ बनवत असतो. या कामात सर्वाधिक उपयोगी येते डिस्क हैरो नावाचे मशीन, याला कल्टीव्हेटरच्या नावानेही ओळखले जाते.आपण यंत्राच्या साहाय्याने गव्हाचे धसही समतल बनव शकतो, असे केल्यास पिकांची उत्पादकता वाढते. भाताची शेती करण्याआधी जमिनीची मशागत करणे महत्त्वाचे असते.
काय आहे डिस्क हैरो - या यंत्राद्वारे पीक कापणीनंतर धानाची पेरणी आधी शेतातील पिकांच्या खोड, धस जमिनीत दाबू शकता. यासह शेत जमीन समतल होत असते. यामुळे धानाची उत्पादकता वाढते, यासह पिकांची वृद्धीही जलद होते.
डिस्क हैरो हे बैल किंवा ट्रॅक्टरच्या मदतीने चालवता येते. बैलाने चालविण्यात येणाऱ्या डिस्क हैरो तिकोनिया आणि खुंटीदार कल्टीव्हेटरचा उपयोग जास्त केला जातो. यासह ट्रॅक्टरचलित डिस्क हैरो (6x6,7x7, 8x8 आणि 12x12 डिस्क संख्या) यात येत असतात. बैलाने चालविण्यात येणाऱ्या डिस्क हैरोची किंमत ५ ते ८ हजार रुपये असते. तर ट्रॅक्टरने चालविण्यात येणारे डिस्क हैरोची किंमत ही २५ ते ५० हजार रुपये इतकी असते. यासह काही राज्य सरकार या यंत्रावर सब्सिडीही देतात.
Share your comments